चारेच्या सरपंचपदी सुनीता जगदाळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:42 IST2021-02-28T04:42:18+5:302021-02-28T04:42:18+5:30
चारे ग्रामपंचायतीवर १० वर्षांपासून आ़ राजेंद्र राऊत गटाचे झेडपीचे माजी विरोधी पक्षनेते संजय पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र, ...

चारेच्या सरपंचपदी सुनीता जगदाळे बिनविरोध
चारे ग्रामपंचायतीवर १० वर्षांपासून आ़ राजेंद्र राऊत गटाचे झेडपीचे माजी विरोधी पक्षनेते संजय पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र, त्याला आव्हान देत यावेळी सोपल गटाचे सुंदरराव जगदाळे यांनी नऊपैकी सहा जागा जिंकून सत्ता खेचून आणली.
एस़ जे़ बुवा यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची विशेष सभा पार पडली़ यावेळी जयश्री गोरे, सतीश लोंढे, प्रशांत जगदाळे, पूजा काळे हे सहा सदस्य हजर होते़ सरपंच, उपसरपंच प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सुंदरराव जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
फोटो
२७चारे०१
ओळी
चारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता जगदाळे यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते सुंदरराव जगदाळे.