शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांसह मातेची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 11:36 IST

विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील घटना, सुदैवाने मुलगी बचावली

ठळक मुद्देमुलांना रुळावर झोपण्यास सांगून तीही रुळावर पडली. लक्ष्मी आणि प्रकाशचा सुखी संसार सुरू असतानाच त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण सुरू

विजयपूर : कौटुंबिक वादातून मातेने दोन चिमुकल्यांसह रेल्वेखाली आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लक्ष्मी प्रकाश बुद्धिहाळ (वय ३६, रा. सातपूर, ता. इंडी, जि. विजयपूर) आणि तिची दोन मुले बिरप्पा (वय ३) आणि अंकुश (वय १) अशी मृतांची नावे आहेत. मात्र सुदैवाने ७ वर्षांची दानम्मा ही बालंबाल बचावली.

८ वर्षांपूर्वी लक्ष्मीचा विवाह प्रकाश बुद्धिहाळबरोबर झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले आणि एक मुलगी झाली. लक्ष्मी आणि प्रकाशचा सुखी संसार सुरू असतानाच त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाले. पतीच्या भांडणाला लक्ष्मी वैतागली होती. आपल्या मुलांसह तिने जीवन संपविण्याचा विचार केला. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास ती तिघा मुलांना घेऊन सातर गावाजवळील रेल्वे रुळावर आली. मुलांना रुळावर झोपण्यास सांगून तीही रुळावर पडली.

मात्र दानम्मा झोपलीच नाही. लक्ष्मीने तिला झोपण्याचा सल्ला दिला. दरम्यान, रेल्वेच्या आवाजाने दानम्माने तेथून पळ काढला. तोपर्यंत त्याची आई आणि दोन भावंडे जागीच मरण पावली. सोलापूर-विजयपूर रेल्वे निघून गेल्यानंतर दानम्मा आपल्या आई व भावंडांना पाहण्यासाठी गेली असता तिघेही मृतावस्थेत पडलेले होते. तिघांच्याही शरीराचे तुकडे झालेले पाहताना दानम्मा जागेवरच बेशुद्ध पडली. 

घटनेचे वृत्त समजताच लोहमार्गचे फौजदार शिवकुमार घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह विच्छेदनासाठी इंडी शासकीय रुग्णालयात हलविले. जखमी दानम्मा त्याच रुग्णालयात उपचार घेत आहे.

‘लक्ष्मी’ गेली... ‘प्रकाश’च्या जीवनात अंधार- सातत्याने भांडणे होत असली तरी लक्ष्मीने जीवन संपविण्याचा निर्णय घेणार, यावर प्रकाशचा विश्वास नव्हता. लक्ष्मी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर प्र्रकाशला जबर धक्का बसला. घटनास्थळी मृतदेहांकडे पाहत त्याने एकच हंबरडा फोडला. ‘लक्ष्मी’ गेल्याने आता ‘प्रकाश’च्या जीवनात अंधार निर्माण झाला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrimeगुन्हाPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस