वाफळ्यात विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:34 IST2021-02-23T04:34:00+5:302021-02-23T04:34:00+5:30

उज्ज्वला ऊर्फ पिंकू गणेश चव्हाण (२२, रा. वाफळे, ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, २१ फेब्रुवारी रोजी ...

Suicide of a married woman in Waffle | वाफळ्यात विवाहितेची आत्महत्या

वाफळ्यात विवाहितेची आत्महत्या

उज्ज्वला ऊर्फ पिंकू गणेश चव्हाण (२२, रा. वाफळे, ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

याबाबत मोहोळ पोलीस सूत्राकडील माहितीनुसार उज्ज्वला ही रविवारी दुपारी घरी होती. दुपारी २ वाजण्याच्या पूर्वी ती बाथरूमला गेली होती. बराच वेळ होऊन गेला तरी ती बाहेर न आल्याने तिचे पती गणेश चव्हाण यांनी बाथरूमचा दरवाजा वाजवून आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. दरवाजा उघडत नसल्याने लाथा मारून तो उघडला असता तिने बाथरूमच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक देवडे करत आहेत.

Web Title: Suicide of a married woman in Waffle