जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:41 IST2021-03-04T04:41:14+5:302021-03-04T04:41:14+5:30

बार्शी : शेळीपालन व्यवसायासाठी माहेरहून लाख रुपये आणावेत म्हणून चालवलेल्या छळाला कंटाळून माहेरी राहात असलेल्या एका विवाहितेने विषारी द्रव्य ...

Suicide of a married woman due to harassment | जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

बार्शी : शेळीपालन व्यवसायासाठी माहेरहून लाख रुपये आणावेत म्हणून चालवलेल्या छळाला कंटाळून माहेरी राहात असलेल्या एका विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी बार्शी पोलिसांनी पतीसह सासरकडील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोनाली विलास वसेकर (२७, रा. सिकंदर टाकळी, ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता माहेरी लक्ष्याची वाडी (ता. बार्शी) येथे आत्महत्या केली. याबाबत सोनालीची बहीण वैशाली बाबासाहेब ढगे (वय ३८, रा. लक्ष्याची वाडी, ता.बार्शी) हिने तालुका पोलिसांत तक्रार दिली.

पती विलास वसेकर, सासरा संभाजी वसेकर, सासू पद्मिनी वसेकर, नणंद, दीर संतोष वसेकर व अश्विनी वसेकर (सर्व, रा.सिकंदर टाकळी, ता.मोहोळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार सोनालीचा विवाह जुलै २०१८ मध्ये झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी शेळीपालन व्यवसायासाठी माहेरहून लाख रुपये आणावेत म्हणून तिचा जाचहाट सुरू केला. तसेच तिला उपाशी ठेवणे, चटके देणे असे प्रकार होत होते. त्यामुळे ती माहेरी आली होती. सासरच्या त्रासास कंटाळून माहेरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

---

०३ सोनाली वसेकर

Web Title: Suicide of a married woman due to harassment