दारूच्या नशेत घरात केली गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:40+5:302021-08-28T04:26:40+5:30

बार्शी : बार्शी तालुक्यातील बावी येथील लक्ष्मण शाहू गाढवे (वय ३८) याने दारूच्या नशेत ...

Suicide by hanging in the house while intoxicated | दारूच्या नशेत घरात केली गळफास घेऊन आत्महत्या

दारूच्या नशेत घरात केली गळफास घेऊन आत्महत्या

Next

बार्शी : बार्शी तालुक्यातील बावी येथील लक्ष्मण शाहू गाढवे (वय ३८) याने दारूच्या नशेत स्वतःच्या घरातील लाकडी आडीस साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. २६ ऑगस्टला ही घटना घडली. मृताचे नातेवाईक मच्छिंद्र उंबरे (३१, रा बावी) यांनी खबर दिली असता आत्महत्येचा गुन्हा नोंदला आहे.

यातील मृत हा फिर्यादीच्या आत्याचा मुलगा असून, फिर्यादी २६ रोजी त्याच्या हॉटेलमध्ये काम करताना त्याच्या आत्यांनी फोनवरून गळफास घेतल्याची माहिती कळविली. त्याची आई व पत्नी शेतात कामास जात होत्या; परंतु हा कोणतेही काम करीत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. घरात कोणी नसताना त्याने गळफास घेतल्याची चर्चा गावात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार रियाज शेख करीत आहेत.

----

Web Title: Suicide by hanging in the house while intoxicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.