पत्नी सोडून गेल्याने परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:06+5:302021-04-08T04:23:06+5:30

संतोषकुमार बाबाजीचरण जेना हा ६ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास फॅबटेक टेक्स्टाईल कॉलनीत असताना त्यांच्या गावातील रहिवासी संतोष ...

Suicide of a foreign youth after leaving his wife | पत्नी सोडून गेल्याने परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

पत्नी सोडून गेल्याने परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

Next

संतोषकुमार बाबाजीचरण जेना हा ६ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास फॅबटेक टेक्स्टाईल कॉलनीत असताना त्यांच्या गावातील रहिवासी संतोष सनातन जेना हा कोल्हापूरहून त्या ठिकाणी आला. यावेळी तो संतोषला पाहून रडत असताना त्याने का रडतोस म्हणून विचारले. त्याने माझी पत्नी मला कोल्हापूरमधून कोठे गेली माहीत नाही त्यामुळे मी सांगोल्याला आलो आहे. तू माझा मित्र आहेस मला तुझ्या कंपनीत काम बघ असे म्हणाला. त्यावेळी संतोषकुमारने तू जेवण केले आहेस का असे विचारले. त्याने जेवण केल्याचे सांगून कॉलनीतील एका खोलीत झोपण्यास सांगितले.

बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास संतोषकुमारने त्यास आवाज दिला. मात्र खोलीतून काहीच हालचाल दिसून आली नाही. म्हणून त्याने खिडकीतून डोकावले. संतोष जेना याने लोखंडी अँगलला लुंगीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत संतोषकुमार बाबाजीचरण जेना यांनी पोलिसांत माहिती दिली आहे.

Web Title: Suicide of a foreign youth after leaving his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.