ऊसाच्या ट्रॅक्टरांची धडक, चालक ठार; सोलापूरात भीषण अपघात 

By रूपेश हेळवे | Updated: December 23, 2022 12:10 IST2022-12-23T12:10:16+5:302022-12-23T12:10:26+5:30

हा अपघात इतका गंभीर होता की, जगदीश हे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मधोमध अडकले.

Sugarcane tractor collide, driver killed; Fatal accident in Solapur | ऊसाच्या ट्रॅक्टरांची धडक, चालक ठार; सोलापूरात भीषण अपघात 

ऊसाच्या ट्रॅक्टरांची धडक, चालक ठार; सोलापूरात भीषण अपघात 

सोलापूर : ट्रॅक्टर खराब झाल्याने बाजूला घेऊन पहाणी करताना पाठीमागून येणार्या दुसऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने तरूण ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. जगदीश शिवगोंडा बिरादार ( अंदाजे वय २५, रा. चडचण) असे मृत चालकाचे नाव आहे. जगदीश हे मुळ चडचण येथील रहिवासी आहे.

ते दक्षिण सोलापूर मधील एका गावातून ऊस घेऊ कारखान्याकडे जात होते. तेव्हा त्याच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने ते ट्रॅक्टर बाजूला लावून पहाणी करताना पाठीमागून येणार्या ट्रॅक्टरने जोरात धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, जगदीश हे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मधोमध अडकले. ही घटना जेव्हा पोलिसांना कळाली तेव्हा विजापूर नाका पोलिस ठाण्याचे हवालदार बहिर्जे हे घटनास्थळी येऊन त्यांनी जगदीश यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. ही घटना गुरूवारी मध्यरात्री घडली.

Web Title: Sugarcane tractor collide, driver killed; Fatal accident in Solapur