शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ कारखान्यांवर साखर आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:18 IST

सोलापूर : ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपये इतकी एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ साखर कारखान्यांना साखर आयुक्त शेखर ...

ठळक मुद्देराज्यातील १८५ साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत ४२७ लाख मे. टन गाळप एफआरपीनुसार १० हजार ४८७ कोटी ३४ लाख रुपये देय ५ हजार ३२० कोटी ३६ लाख देणेबाकी

सोलापूर: ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपये इतकी एफआरपी थकविणाºया राज्यातील १७४ साखर कारखान्यांना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोटिसा बजावल्या असून, ३९ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. १३५ कारखान्यांवर एक व दोन फेब्रुवारी रोजी होणाºया सुनावणीनंतर कारवाई होणार आहे.

राज्यात १८५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. यापैकी केवळ ११ साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंतची एफआरपीची संपूर्ण रक्कम दिली आहे. उर्वरित १७४ साखर कारखान्यांनी ५ हजार ३२० कोटी ३५ लाख रुपये थकविले आहेत. यामध्ये १५ टक्क्यांपर्यंत एफआरपी (रास्त आणी किफायतशीर दर) देणाºया ३९ साखर कारखान्यांवर आरआरसी नुसार कारवाईचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी या कारखान्यांची साखर व अन्य मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून शेतकºयांचे पैसे देणार आहेत.

उर्वरित १३५ साखर कारखान्यांनी १६ ते ९९ टक्के इतकी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली आहे. अशा कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त गायकवाड घेणार आहेत. एक फेब्रुवारी रोजी पुणे व कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची तर २ फेब्रुवारी रोजी अन्य जिल्ह्यांतील कारखान्यांची सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर या साखर कारखान्यांवर कारवाई निश्चित होणार आहे. 

सोलापूरच्या सहा कारखान्यांकडे २१४ कोटी

  • - राज्यातील १८५ साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत ४२७ लाख मे. टन गाळप केले असून, याची एफआरपीनुसार १० हजार ४८७ कोटी ३४ लाख रुपये देय आहे. त्यापैकी ५ हजार १६६ कोटी ९९ लाख रुपये कारखान्यांनी दिले असून, ५ हजार ३२० कोटी ३६ लाख देणेबाकी आहे. 
  • - सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर (३९ कोटी ४० लाख), कूर्मदास (१४ कोटी २० लाख), विठ्ठल रिफायनरी (४२ कोटी १५ लाख), गोकुळ (४२ कोटी १ लाख), जयहिंद (२० कोटी २४ लाख) व बबनराव शिंदे केवड (५५ कोटी ७२ लाख) रुपये असे २१३ कोटी ७३ लाख रुपये थकल्याने या कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्यात येत आहे. 

१५ जानेवारीअखेरीस शून्य एफआरपी दिलेले कारखानेकारखाना    रक्कम कोटींत

  • तात्यासाहेब कोरे-वारणा    ११६.०२

देशभक्त आर. के. - पंचगंगा    ७४.३९

  • किसनवीर भुर्इंज    ६३.२७
  • किसनवीर-प्रतापगड    ८.४१
  • किसनवीर-खंडाळा    २२.३०
  • समृद्धी शुगर-जालना    ४२.५६
  • वैद्यनाथ-बीड    ३२.६४
  • त्रिधारा शुगर-परभणी    १७.०६
  • शैला अतुल शुगर-उस्मानाबाद    ५.३२
  • शंभू महादेव-उस्मानाबाद    १०.३१
  • पांगेश्वर-लातूर    १७.८०
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी