शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; एफआरपी थकविणाºया कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:43 IST

राज्यातील ७६ कारखान्यांना गाळप परवाने; एफआरपी चुकती करणाºयांनाच गाळप परवाना देण्याची साखर आयुक्तांची भूमिका कायम

ठळक मुद्देमागील तीन-चार वर्षापासून वरचेवर एफआरपी थकविणाºया कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहेजिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यत गाळप परवाना दिला आहे१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणार्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार

सोलापूर : मागील वर्षीच्या उसाची संपुर्ण रक्कम दिल्यानंतरच गाळप परवाना, या साखर आयुक्तांच्या भूमिकेमुळे एफआरपी न देणाºया कारखान्यांना नोटीस काढण्यात आली आहे. साखर सहसंचालक कार्यालयाकडून १७० प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला सादर झाले असले तरी सोमवारपर्यत राज्यातीत ७६ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. 

राज्यातील १९८ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गाळपासाठी परवाने मागीतले आहेत. साखर सहसंचालक कार्यालयाकडून तपासणी करुन जवळपास १७० कारखान्यांचे अर्ज साखर आयुक्त कार्यालयाला सादर झाले आहेत. यापैकी ७६ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. उर्वरित कारखान्यांचे प्रस्ताव तपासणी करून साखर आयुक्तांकडे सादय केले जात आहेत. एफआरपी थकलेल्या कारखान्यांची माहिती सहसंचालक कार्यालयाकडूनच दिल्याने परवान्यासाठी प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात पेंडीग आहेत. आता एफआरपी थकविणार्या कारखान्यांना रितसर नोटीस पाठविण्यात आली आहे. शेतकºयांचे पैसे थकविणार्या कारखान्यांची आरआरसी करण्याची कारवाई करण्यासाठी ही नोटीस आहे. 

मागील तीन-चार वर्षापासून वरचेवर एफआरपी थकविणाºया कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे एफआरपी थकविणार्या व टप्पे पाडून ऊस बिल देणार्या कारखान्यांची संख्या ४३ इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले. भागभांडवल व शासनाची थकहमी देण्यासाठीही नोटीस देण्यात आल्या आहेत.--------------

  • सोलापूर जिल्ह्यातील एकरकमी एफआरपी न देता शेतकºयांसोबत करार करुन टप्पा पद्धतीने जिल्ह्यातील पाच कारखाने शेतकर्यांना उसाचे बिल देत आहेत. हे साखर कारखाने येत्या दिवाळीला शेवटचा हप्ता देणार आहेत. माञ साखर आयुक्तांच्या तंबीमुळे साखर कारखाने सुरू करण्याअगोदर संपुर्ण रक्कम द्यावे लागणार आहेत. याशिवाय एफआरपी थकविणारे पाच कारखाने आहेत. 
  • - या पाच कारखान्यांन्यापैकी श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने शेतकर्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा केली आहे. 
  • - जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यत गाळप परवाना दिला आहे. लोकनेतेबाबुरावआण्णा पाटील, भैरवनाथ लवंगी,जकराया शुगर, इंद्रेश्वर, विठ्ठलराव शिंदे करकंब, गोकुळ माऊली,औदुंबरआण्णा पाटील आष्टी या कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे.

--------

१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणार्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार आहे. ज्यांनी- ज्यांनी एफआरपी दिली नाही त्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांंचे पैसे देण्याची नोटीस काढली आहे. तरीही शेतकºयांचे पैसे दिले नाहीत तर आरआरसीची कारवाई केली जाईल.- शेखर गायकवाड साखर आयुक्त, पुणे 

केवळ साखर विक्रीचे कारखानदार बोलतात. इथेनॉल, वीज व इतर उत्पादनातून मिळणार्या पैशाचाही हिशोब कारखानदारांनी दिला पाहिजे. दीड वर्षे सांभाळलेल्या उसाचे अडीच वर्षानंतरही व्याजासह शेतकर्यांना पैसे मिळाले पाहिजेत.-प्रभाकर देशमुख जनहित शेतकरी संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने