शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Good News; आता पोस्टातून मिळणार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:51 IST

२३ हजार विद्यार्थ्यांची खाती उघडणार; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा

ठळक मुद्देबँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणाºया लोकांपर्यंत सर्वप्रकारच्या बँकिंग सेवा पोहोचविणे हा उद्देशभारतीय टपाल विभागांतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक १ सप्टेंबर २०१८ ला सुरू झाली सोलापूर जिल्ह्यात अद्याप १ लाख २० हजार नागरिकांनी पोस्ट बँकेत आपले खाते उघडले आहे

सोलापूर : राज्याच्या सामाजिक न्याय योजनेंतर्गत दहावीनंतर दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे पैसे बँकेऐवजी आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) मार्फत देण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात येणार आहेत़ या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पैसे मिळण्यास सुलभ व सोयीस्कर होणार आहे़ तसेच विद्यार्थ्यांची आधार कार्ड लिंक अथवा बँक खात्यामुळे शिष्यवृत्ती मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांना पोस्टात खाते उघडल्यानंतर त्वरित शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे विद्यार्थी देखील समाधानी होत आहेत.

दरम्यान, बँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणाºया लोकांपर्यंत सर्वप्रकारच्या बँकिंग सेवा पोहोचविणे हा उद्देश घेऊन भारतीय टपाल विभागांतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक १ सप्टेंबर २०१८ ला सुरू झाली असून सोलापूर जिल्ह्यात अद्याप १ लाख २० हजार नागरिकांनी पोस्ट बँकेत आपले खाते उघडले आहे. कोणत्याही बँकेच्या खातेदाराला बोटाच्या ठशाद्वारे पोस्टात तर पोस्टमन हे घरपोच पैसे देणे अशा सुविधा दिल्या आहेत.

अशी होणार शिष्यवृत्ती जमा...आयपीपीबीतर्फे शिष्यवृत्तीची ही नवीन प्रणाली ८ सप्टेंबर २०२० पासून सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे तत्काळ मिळावेत, यासाठी सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांंची यादी टपाल विभागाला पाठवली आहे. सोलापूर जिल्ह्यात २३ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाच्या आधारे विद्यार्थ्यांचे खाते उघडले जाणार आहे. विद्यार्थ्याचे नाव टाकल्यावर विद्यार्थ्यांचे पैसे शासन या प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहेत. अद्याप ८०० विद्यार्थ्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खाते उघडले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे खाते उघडण्याबाबत माहिती दिली असून उर्वरित विद्यार्थ्यांनी लवकरच खाते उघडावे असे आवाहन पोस्टाद्वारे करण्यात आले आहे.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाºया शिष्यवृत्ती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमुळे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट आॅफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडावे. - एस. पी. पाठक- प्रवर अधीक्षक, पोस्ट कार्यालय, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रEducationशिक्षणStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीPost Officeपोस्ट ऑफिस