शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

विद्यार्थी उद्याच्या भारताचे शास्त्रज्ञ, शोभाताई बनशेट्टी यांचे प्रतिपादन, ४३ व्या सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:10 PM

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, रा.स. चंडक प्रशाला, एस.ई.एस. ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एस.ई.एस. तंत्रनिकेतनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ४३ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी शोभाताई बनशेट्टी बोलत होत्या.

ठळक मुद्देस्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथे होणाºया राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभागी होता येणारजागतिक पातळीवर भारताची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी नवनवीन संशोधनाची गरजतंत्रज्ञानाबरोबर विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी केगाव येथील विज्ञान केंद्राला भेट देणे आवश्यक

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ :  प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले आहे. याच विद्यार्थ्यांमधून उद्याचे समृद्ध भारताचे शास्त्रज्ञ निर्माण होणार आहेत. भारताचे नाव जगामध्ये उज्ज्वल करणारे हेच भावी आधारस्तंभ असणार आहेत, असा विश्वास महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, रा.स. चंडक प्रशाला, एस.ई.एस. ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एस.ई.एस. तंत्रनिकेतनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ४३ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी शोभाताई बनशेट्टी बोलत होत्या. यावेळी प्राचार्य गणेश देशपांडे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्ही.एस. राजमान्य, प्रा. मनीषा स्वमाी, प्रा. पी.एस. भोपळे, प्रा. नागेश नकाते, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अशोक भांजे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी म्हणाल्या की, आधुनिक युगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. जागतिक पातळीवर भारताची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी नवनवीन संशोधनाची गरज आहे. तंत्रज्ञानाबरोबर विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी केगाव येथील विज्ञान केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ३० रूपये शुल्क आकारले जाते, ते पुढील काळात महापालिकेकडून उचलले जाईल, असे आश्वासन यावेळी महापौरांनी दिले. यावेळी महापौरांच्या हस्ते बक्षीसपात्र विद्यार्थी व शिक्षकांना पारितोषिके देण्यात आली.यावेळी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अशोक भांजे म्हणाले की, स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथे होणाºया राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. जिल्हा परिषद सातत्याने असे कार्यक्रम राबविणार असून, त्यासाठी महानगरपालिकेने ठराविक अनुदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन जयंत मोरे यांनी केले. आभार प्रभावती ढाले यांनी मानले. -----------------------बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे...च्उच्च प्राथमिक विद्यार्थी: प्रथम क्रमांक - समर्थ तेलीकोणे (मंगरूळे प्रशाला, अक्कलकोट), द्वितीय - अथर्व राऊत (महाराष्ट्र विद्यालय, बार्शी), तृतीय- आदित्य भालेराव (भैरवनाथ विद्यालय, अंकोली). माध्यमिक व उच्च माध्यमिक: प्रथम - सत्यजित पवार (जि.प. प्राथमिक शाळा कारंबा), द्वितीय आर.एम.तांबोळी, तृतीय-एस.व्ही.सी.एस.हायस्कूल, बोरामणी. प्राथमिक शिक्षक: प्रथम- शिवराज ढाले (जि.प.प्राथमिक शाळा कारंबा), द्वितीय-आर.एम.तांबोळी (इनोव्हेटिव्ह स्कूल, अंकोली), तृतीय- गोपाळ गावित (जि.प. प्राथ. शाळा भिंजवाडा, अकलूज). माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गट : प्रथम- अशोकानंद राक्षे (वामनराव माने, प्रशाला), द्वितीय- एस.आर. जवंजाळ (हर्षवर्धन हायस्कूल, हिप्परगे), तृतीय- राजकुमार उबाळे (जगदंबा विद्यालय, पोखरापूर). प्राथमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण: प्रथम- प्रमोद कुलकर्णी (रा.सं.चंडक हायस्कूल, सोलापूर), द्वितीय- लक्ष्मण नरूणे (इंग्लिश स्कूल, मंगळवेढा), तृतीय- कल्याण बारवे (जि.प. प्रशाला, मार्डी). 

टॅग्स :Solapurसोलापूर