सुवर्णमध्य साधून पक्षसंघटन मजबूत करा : गणेश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST2021-06-24T04:16:37+5:302021-06-24T04:16:37+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी आढावा बैठक जिल्हा निरीक्षक शरद लाड यांच्या उपस्थितीत पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश ...

सुवर्णमध्य साधून पक्षसंघटन मजबूत करा : गणेश पाटील
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी आढावा बैठक जिल्हा निरीक्षक शरद लाड यांच्या उपस्थितीत पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश पाटील होते. यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणी संबंधित आढावा घेण्यात आला. कोरोनाकाळात रक्तदान शिबिर, प्लाझ्मा डोनेट, वाफेचे मशीन भेट देणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट, गोरगरिबांना धान्य वाटप याबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा निरीक्षक शरद लाड यांनी कोरोनाकाळात पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल जिल्हाध्यक्षांकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी प्रदेश कार्यालयीन युवक सरचिटणीस अरुण आसबे, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस, जिल्हा सचिव अतुल खरात, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी, विजय काळे, सुजित गायकवाड, शहराध्यक्ष स्वप्निल जगताप, संतोष चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील यांनी आभार मानले.