सोलापुरातील पंजाब तालीम परिसरात दगडफेक; दोन गटात वाद झाल्यानं गाड्यांची तोडफोड

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 25, 2025 22:42 IST2025-05-25T22:41:36+5:302025-05-25T22:42:47+5:30

दरम्यान, पोलीस वेळीच पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेत दोन्ही गटाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

Stone pelting in Punjab Talim area in Solapur; Cars vandalized due to dispute between two groups | सोलापुरातील पंजाब तालीम परिसरात दगडफेक; दोन गटात वाद झाल्यानं गाड्यांची तोडफोड

सोलापुरातील पंजाब तालीम परिसरात दगडफेक; दोन गटात वाद झाल्यानं गाड्यांची तोडफोड

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : मावा विक्री प्रकरणावरून वडार गल्ली आणि बाबा कादरी मशिद या दोन गटात वाद होऊन दगडफेक झाली. अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे लोकांची पळापळ झाली.

दरम्यान, पोलीस वेळीच पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेत दोन्ही गटाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. घटनास्थळावर शहर पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून घटनेतील लोकांचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या या भागातील रस्ता बंद करण्यात आला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Stone pelting in Punjab Talim area in Solapur; Cars vandalized due to dispute between two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.