शेतकºयाचा दगडाने ठेचून खून, सोलापूर जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:41 IST2018-11-03T12:40:09+5:302018-11-03T12:41:53+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील मौजे अंबाड येथील शेतकºयाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ लक्ष्मण ...

शेतकºयाचा दगडाने ठेचून खून, सोलापूर जिल्ह्यातील घटना
ठळक मुद्दे- पोलीस घटनास्थळी दाखल- मारेकºयांच्या शोधासाठी पथके रवाना- संशयितांना ताब्यात घेण्यास पोलिसांकडून तपास यंत्रणा लागली कामाला
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील मौजे अंबाड येथील शेतकºयाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ लक्ष्मण जगन्नाथ गाडे (वय ३६ ) असे खून झालेल्या शेतकºयाचे नाव आहे़ ही घटना शनिवार ३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अंबाड व पिंपळखुटे रस्त्यावर घडली.
शनिवारी सकाळी पुतण्या अंबाड येथे महाविद्यालयाकडे निघाला होता. त्यावेळी रस्त्यावर त्याला लक्ष्मणचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मोटारसायकल ही पडली होती. कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालय येथे मयत शेतकºयाचे शवविच्छेदन करण्यासाठी आणले आहे.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...