चोरलेला ट्रॅक्टर वाळू उपशासाठी दिसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST2021-07-04T04:16:43+5:302021-07-04T04:16:43+5:30

अक्कलकोट : अंकलगी (ता. अक्कलकोट) येथून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर चार आरोपींनी रात्रीच्या वेळी चोरून नेला. ३० जून रोजी रात्री ...

The stolen tractor appeared for sand subsidence | चोरलेला ट्रॅक्टर वाळू उपशासाठी दिसला

चोरलेला ट्रॅक्टर वाळू उपशासाठी दिसला

अक्कलकोट : अंकलगी (ता. अक्कलकोट) येथून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर चार आरोपींनी रात्रीच्या वेळी चोरून नेला. ३० जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

अधिक माहिती अशी की, आरोपी प्रशांत मंगरुळे, राकेश विजापुरे, राहुल न्हावी, अजित विजापुरे सर्व (रा. गुद्देवाडी) यांनी फिर्यादी सिद्धाराम शिवानंद साबणे (रा. अंकलगी) यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सिंदगी मामा चनवीरप्पा वडगिरे यांच्याकडून ५ लाखांचा ट्रॅक्टर आणला होता. ३० जून रोजी दिवसभर काम करून संध्याकाळी ७ वाजता घरासमोर लावून रात्री गच्चीवर झोपी गेले होते. तेव्हा रात्री १० वाजता आरोपींनी ट्रॅक्टरची चोरी केली.

दुसऱ्या दिवशी गुद्देवाडी येथील नदीतून वाळू चोरी करून त्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडून कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत.

---

ट्रॅक्टर मागण्यास गेल्यावर मारहाण

या घटनेनंतर फिर्यादी सिद्धाराम साबणे १ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता गावातील बसवराज विजापुरे, संजय कोळी, महातेश कोळी यांना सोबत घेऊन गुद्देवाडी येथे गेले. त्यांनी आरोपींना ट्रॅक्टर द्या, असे म्हणताच सर्वांनी ‘तुझे कुठले ट्रॅक्टर, आम्हाला माहिती नाही, येथून निघून जा,’ म्हणून मारहाण करून जखमी केले. यामुळे वरील चौघांविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हाही नोंदला आहे.

Web Title: The stolen tractor appeared for sand subsidence