Breaking; वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सावत्र आईचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:09 IST2020-10-21T20:26:29+5:302020-10-21T21:09:04+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सावत्र आईचा खून
पंढरपूर : सावत्र आईचा मुलानेच धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे चार ते पाचच्या दरम्यान पंढरपुरातील संत गजानन महाराज मठाच्या मागील बाजूस असलेल्या लक्ष्मी नगर येथे घडली. प्रभावती मधुकर कदम (वय ४५ वर्षे ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभावती मधुकर कदम (वय ४५ वर्षे ) या राहत्या घरात एकट्याच असताना त्याचा मुलगा संजय उर्फ भोला मधुकर कदम याने धारदार शस्त्राने त्याची हत्या करून घराला बाहेरून कडी लावून निघुन गेला. थोड्यावेळाने त्याच्या सावत्र बहिणीने घराची कडी उघडली असता तिला आईचा खून झाल्याचे दिसले. याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी भेट दिली आहे.
प्रभावती मधुकर कदम यांचे पती मधुकर कदम यांचा १५ दिवसापूर्वी 'कोरोना'ने मृत्यू झाला होता. त्यांना दोन सावत्र मुले व एक मुलगी असा परिवार आहे. संजय उर्फ भोला कदम यांना शोधण्याचे काम पोलिस करत आहेत.