शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 17:50 IST

आमदार गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी

सोलापूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत, या आंदोलनावर कोणत्या प्रकारचा तोडगा राज्य सरकार काढत नाही. एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच हायकोर्टाने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक कमिटी तयार केली आहे. या कमिटीला आदेश देण्यात आले आहे की, एसटी कर्मचारी प्रश्नावर त्वरीत तोडगा काढण्यासंदर्भात निर्णय घ्या. एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत, आत्महत्या करीत आहेत, अशा वेळी सरकारने यावर त्वरीत तोडगा काढणे गरजेचे आहे, मात्र सरकार असंवेदनशील असल्याने यावर निर्णय होत नाही. आता हायकोर्टाच्या आदेशानुसार कमिटीने त्वरीत निर्णय घ्यावा अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. 

-------

गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा द्या...

सरकारविरोधात आवाज उठविणारे आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत, त्यासाठी सरकारने पडळकर यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  शरद पवार यांच्या सांगण्यावरून सत्तेवर असताना भाजप सरकारने राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना सुरक्षा दिल्याचीही आठवण यावेळी फडणवीस यांनी करून दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडGopichand Padalkarगोपीचंद पडळकरST Strikeएसटी संप