शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेमार्फत शेतकºयांना थेट कर्ज वाटपाचा प्रस्ताव बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:53 IST

अडचणीतील जिल्हा बँकांसाठी पर्याय; प्रायोगिक तत्त्वावर सोसायट्यांमार्फत कर्जपुरवठा करण्याचे धोरण

ठळक मुद्दे राज्यात अनेक शेतकरी हे केवळ विकास सोसायटीचे सभासद आहेतजिल्हा बँकांकडे पैसे नसल्याने त्यांना कर्ज मिळू शकत नाहीएखादा शेतकरी विकास सोसायटीचा पूर्वी सभासद व कर्जदार आहे

सोलापूर:  मागील काही वर्षांत राज्यातील अडचणीतील जिल्हा बँकांची संख्या वरचेवर वाढत असल्याने राज्य बँक पर्याय ठरु शकते असे वाटत आहे. थेट विकास सोसायट्यांमार्फत शेतकºयांना कर्जवाटपासाठी राज्य बँकेने नेमलेल्या समितीने प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यात विकास सोसायटीमार्फत थेट कर्जपुरवठा करण्याची शिफारस केली आहे; मात्र समितीच्या अहवालावर नाबार्डकडे काथ्याकूट सुरू असल्याचे सांगण्यात आले.

राज्य कृषी तथा भूविकास बँक कायमची बंद झाल्यानंतर शेतकºयांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँका पुढे आल्या होत्या. केवळ शेतकºयांसाठी विहीर, पाईपलाईन तसेच शेतीविषयक बाबींसाठी कर्ज देण्यासाठी राज्यात भूविकास बँकेची सुरुवात झाली होती. कालांतराने जिल्हा बँकांनाही शेतीसाठी कर्ज देण्याची मर्यादा वाढविल्याने भूविकास बँका डबघाईला आल्या व बंदही पडल्या. 

यामुळे शेतकºयांची बँक म्हणून केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे पाहिले जात असतानाच आर्थिक शिस्त पाळली नसल्याच्या कारणामुळे राज्यातील ८ ते १० जिल्हा बँका कमालीच्या तोट्यात आहेत. तोट्यातील जिल्हा बँकांची संख्या वरचेवर वाढत असल्याने थेट राज्य बँक विकास सोसायट्यामार्फत शेतकºयांना कर्ज देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला.  राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी थेट कर्ज देण्याची घोषणाही केली होती.

राज्य बँकेने मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये यासाठी जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील शेतकºयांना राज्य बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पथदर्शी योजना तयार करण्याची समिती नेमली होती. यामध्ये राज्य बँकेचे सरव्यवस्थापक दिलीप दिघे, सोलापूर जिल्हा  बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, बुलढाणा जिल्हा बँकेचे अशोक खरात तसेच मुंबई जिल्हा उपनिबंधक दिगंबर साळुंखे यांचा समावेश होता. या समितीने अडचणीतील जिल्हा बँकांना राज्य बँकेने थेट विकास सोसायट्यामार्फत कर्जपुरवठा करण्याबाबत अहवालही दिला आहे. 

कोणाला मिळणार कर्ज ....- राज्यात अनेक शेतकरी हे केवळ विकास सोसायटीचे सभासद आहेत; मात्र जिल्हा बँकांकडे पैसे नसल्याने त्यांना कर्ज मिळू शकत नाही  तसेच याशिवाय एखादा शेतकरी विकास सोसायटीचा पूर्वी सभासद व कर्जदार आहे, त्याचे बागायती क्षेत्र वाढल्याने कर्ज मर्यादाही वाढली आहे; मात्र बँकेची आर्थिक स्थिती नसल्याने कर्ज देऊ शकत नाही,अशांना कर्ज देण्याची शिफारस समितीने केली आहे. - समितीच्या सदस्यांसोबत राज्य बँकेच्या अधिकाºयांनी केलेल्या चर्चेनुसार बुलढाणा व सोलापूर जिल्ह्यात  प्रायोगिक तत्त्वावर राज्य बँकेने थेट विकास सोसायटीमार्फत कर्जपुरवठा करण्याचे ठरले होते; मात्र यामुळे जिल्हा बँकांचे अस्तित्व संपेल असे नाबार्डला वाटत असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँकgovernment schemeसरकारी योजना