बांधकामाच्या वादातून सळईने मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST2021-09-23T04:25:27+5:302021-09-23T04:25:27+5:30

पोलीस सूत्रानुसार फिर्यादी हणमंत अशोक भानुमते व आरोपी यांचे दहा वर्षांपासून शेती व घर जागा वाटणीसाठी तक्रारी आहेत. मंगळवारी ...

Stabbing in a construction dispute; Crimes against six people | बांधकामाच्या वादातून सळईने मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

बांधकामाच्या वादातून सळईने मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

पोलीस सूत्रानुसार फिर्यादी हणमंत अशोक भानुमते व आरोपी यांचे दहा वर्षांपासून शेती व घर जागा वाटणीसाठी तक्रारी आहेत. मंगळवारी संगणा भानुमते फिर्यादीच्या बाजूला बांधकाम करीत होता. त्यावेळी त्याने प्रॉपर्टी वाटणी अद्याप झाली नाही, यामुळे तुम्ही या ठिकाणी बांधकाम करू नका, असे सांगितले. तेव्हा संगणाने माझे बापाचे शेत आहे, मी बांधणार, असे सांगितले. यावरून वाद झाला. त्याप्रसंगी आरोपी संगणा भानुमते, सुनंदा भानुमते, सिद्धाराम भानुमते, मलप्पा भानुमते, (सर्व रा. धारसंग) तसेच राजश्री भानुमते (रा. कुमठे ता. अक्कलकोट, धुंडप्पा भैरगोंडे (रा तद्देवाडी ता. इंडी)यांनी फिर्यादी हणमंत व शोभा भानुमते, सुजाता भानुमते याना लोखंडी सळईने मारहाण केली. याप्रकरणी दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. तसेच या घटनेत फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे बोरमाळ गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

----

Web Title: Stabbing in a construction dispute; Crimes against six people