सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन जाहीर

By Admin | Updated: June 13, 2017 12:45 IST2017-06-13T12:45:52+5:302017-06-13T12:45:52+5:30

-

SSO nomination for Solapur taluka police station | सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन जाहीर

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन जाहीर


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन जाहीर झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली.
कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ठाण्यातील सुव्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले होते तसेच नामांकन मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना केली होती.त्यानुसार सर्व वरीष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे आणि परिसर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. दररोजच्या स्वच्छतेबरोबरच शस्त्रागार,संगणक कार्यालय आदी विभागही टापटीप ठेवले होते.पोलीस वेल्फेअरसुद्धा चांगल्या प्रकारे अंमलात आणले होते. काही दिवसांपूर्वी वादळामुळे ठाण्याच्या समोरील पिंपळाचे वृक्ष ठाण्याच्या इमारतीवर कोसळले होते.त्यावेळी तातडीने कार्यवाही करून वृक्ष हटविण्यात आले होते.नामांकन मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळोवेळी काळजी घेतल्यानेसुद्धा नामांकन मिळण्याला मोठा हातभार लागला होता.
याबद्धल पोलीस अधीक्षक विरेश प्रभू,अप्पर पोलीस अधीक्षक संजय मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: SSO nomination for Solapur taluka police station