शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

पंढरीतील दर्शन रांगेतील भाविकांना स्प्रिंकलर, कुलरचा थंडावा; दर्शन रांगेत थांबणाऱ्यांसाठी पत्राशेड उभारणी

By रवींद्र देशमुख | Published: April 16, 2024 6:18 PM

चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाखांच्या आसपास वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा मंदिर समितीच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सोलापूर : चैत्री यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शन रांगेत थांबणाऱ्या भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी मंदिर समितीकडून दर्शन रांगेत स्कायवॉकपासून पत्राशेडपर्यंत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री टाकणे व कायमस्वरूपी ४ पत्राशेड येथे तात्पुरते ३, असे एकूण ७ पत्राशेड उभारण्यात आले आहेत.

चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाखांच्या आसपास वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा मंदिर समितीच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा-खिचडी वाटप करण्यात येत आहे.

वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पत्राशेडमध्ये कुलर, फॅन व यंदा प्रथमच थंडाव्यासाठी स्प्रिंकलर बसविण्यात येत आहेत. तसेच मंदिर परिसरात रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, प्रथमोपचार केंद्र, हिरकणी कक्ष, चेंजिंग रुम तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच वेदांता, व्हिडीओकॉन व विठ्ठल रुक्मिणी या ३ भक्तनिवासामधील ३६१ रुममध्ये सुमारे १६०० भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आल्याचे शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून...सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. भाविक एकादशीनिमित्त उपवास करत असतात. उन्हामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन, भाविकांची प्रकृती बिघडू नये, भाविकांना अस्वस्थ वाटू नये. दर्शन रांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला लिंबू सरबत/मठ्ठा व तांदळाची/साबुदाण्याची खिचडी व गोड बुंदी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर समितीकडून मिनरल वॉटर, चहा, खिचडी, अन्न प्रसादही मंदिर समितीकडून देण्यात येणार आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूर