शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

कुजलेले शेणखत अन् बेसल खताच्या डोसावर घेतले वीस लाखांचे पेरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:12 IST

विशाखापट्टणममधून आणली रोपे : शेटफळमधील शेतकºयाचा दोन एकरावरील प्रयोग यशस्वी

ठळक मुद्देरासायनिक बेसल खताचा डोस देऊन पाच महिन्यांत १५ टन उत्पादन घेण्याची किमया साधलीआजपर्यंत  १५ टन उत्पादन मिळाले़ दिल्ली, हैदराबाद, पुणे बाजारपेठेत या फळाला सुरुवातीला १२० ते १५० रुपये दर मिळाला

नासीर कबीरकरमाळा : मित्राच्या दुकानात बसलेल्या तरुणाला व्हीएनआर वाणाच्या पेरूची माहिती मिळाली़ विचार स्वस्थ बसवेना़ विशाखापट्टणम येथून आणलेल्या रोपांची दोन एकरावर लागवड केली़ या फळपिकाने जवळपास २० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे़ कुजलेले शेणखत आणि रासायनिक बेसल खताचा डोस देऊन पाच महिन्यांत १५ टन उत्पादन घेण्याची किमया साधली आहे करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील एका शेतकºयाने़ 

विजय लबडे असे त्या पेरू उत्पादकाचे नाव आहे. २०१७ साली मित्राच्या कृषी केंद्रात गप्पा मारत असताना एका व्यक्तीने पेरूच्या व्हीएनआर या वाणाची माहिती दिली़ त्यातून त्याचे फायदे लक्षात आले़ यापूर्वी केळी, कलिंगड, कांदा या पिकांचे भरघोस उत्पादन घेतलेल्या लबडे यांनी विशाखापट्टणम येथील नर्सरीमधून आणलेल्या व्हीएनआर जातीच्या रोपांची मार्च २०१७ मध्ये स्वत:च्या दोन एकरात आठ बाय आठ फूट अंतरावर लागवड केली. तत्पूर्वी आठ ट्रेलर कुजलेले शेणखत टाकून मशागत केली़ २२ जून २०१८ रोजी छाटणी करून रासायनिक खतांचा बेसल डोस दिला़ बुरशीनाशक व कीटकनाशके यांच्या चार फवारण्या केल्या़ तसेच १३:०:४५, ०:५२:३४: ची मात्रा दिली़ अवघ्या पाच महिन्यांत फळ विक्रीसाठी तयार झाले़

आजपर्यंत  १५ टन उत्पादन मिळाले़ दिल्ली, हैदराबाद, पुणे बाजारपेठेत या फळाला सुरुवातीला १२० ते १५० रुपये दर मिळाला़ सध्या सरासरी ६० रुपये दर मिळतो आहे़ या फळाने आजपर्यंत नऊ लाख रुपयांचे उत्पन्न दिले आहे़ पेरूचे आणखी वीस टन उत्पादन निघणार आहे़ यातून त्यांना आणखी अकरा लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. व्हीएनआर जातीच्या पेरूचे वजन एक ते सव्वा किलोच्यावर पोहोचले असून, या पेरूचा दिल्ली आणि हैदराबाद बाजारपेठत बोलबाला झाला आहे़ दोन एकर क्षेत्रावर वीस लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न निघत आहे. 

आंतरपिकातून घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न - मधल्या काळात आंतरपिकांपासून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले. सुरुवातीला कलिंगडाची लागवड केली़ यापासून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले़ नंतर याच पेरूच्या बागेमध्ये मिरची व झेंडूचे आंतरपीक घेतले़ मिरचीपासून ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले़ तसेच झेंडूचे पीक घेतले़ यातून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले़ यानंतर कांद्याचे पीक घेतले़ यात सव्वादोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले़ 

आपल्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन मित्र नानासाहेब साळुंके, महावीर निंबाळकर यांनीही सध्या दहा एकर क्षेत्रावर या पेरूची लागवड केली आहे़ सर्व फळाला क्रॉप कव्हर वापरून फ्रूट ट्रीटमेंट दिली आह़े  प्रत्येक फळ सहाशे ते चौदाशे ग्रॅमपर्यंत झाले आहे़ सध्या पॅकिंग बॉक्स तयार करून तिघे एकत्रित मार्के टिंग करत आहोत.- विजय लबडे, पेरू उत्पादक, शेटफळ

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीvisakhapatnam-pcविशाखापट्टणमAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार