शिवजयंतीत डिजेचा आवाज वाढला; चार मंडळांवर ॲक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2023 22:02 IST2023-02-20T22:00:57+5:302023-02-20T22:02:24+5:30
कोणत्याही सार्वजनिक उत्सवामध्ये डीजेचा आवाज मर्यादेत ठेवण्याच्या सूचना पोलिस खात्यांकडून देण्यात आल्या आहेत.

शिवजयंतीत डिजेचा आवाज वाढला; चार मंडळांवर ॲक्शन
विलास जळकोटकर/सोलापूर
सोलापूर: कोणत्याही सार्वजनिक उत्सवामध्ये डीजेचा आवाज मर्यादेत ठेवण्याच्या सूचना पोलिस खात्यांकडून देण्यात आल्या आहेत. तरी शिवजयंती विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डिजेचा आवाज घुमला. या प्रकरणी फौजदार चावडी आणि जोडभावी पोली ठाण्यात सोमवारी चार गुन्हे नोंदवण्यात आले. डिजेसह, जनरेटर, वाहनं जप्त करुन पोलिसांनी आपला ॲक्शन मोड दाखवून दिला.शिवजयंती उत्सव साजरा करण्यापूर्वी शांतता कमिटीची बैठक घेऊन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी डिजेच्या आवाजावर मर्यादा ठेवा असे आवाहन केले होते.
मात्र त्याची अंमलबजावणी रविवारच्या विसर्जन मिरवणुकीत आढळून आली नाही. यावर फौजदार चावडी आणि जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या मिरवणुकीमध्ये ध्वनीक्षेपकाच्या आवाजाच्या मर्यादेचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांनी ४ शिवजयंती उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये वापरली वाहने, ध्वनीक्षेपक, जनरेटरसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"