'कोरोना' बाबत सोलापूरची स्थिती चिंताजनक; मार्गदर्शनासाठी विशेष पथक पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 04:49 PM2020-06-14T16:49:04+5:302020-06-14T16:53:26+5:30

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती; अधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक 

Solapur's position on 'Corona' is worrisome; A special team will be sent for guidance | 'कोरोना' बाबत सोलापूरची स्थिती चिंताजनक; मार्गदर्शनासाठी विशेष पथक पाठवणार

'कोरोना' बाबत सोलापूरची स्थिती चिंताजनक; मार्गदर्शनासाठी विशेष पथक पाठवणार

googlenewsNext
ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सोलापूर दौऱ्यावरकोरोना संदर्भात सोलापूर जिल्ह्याचा घेतला आढावामृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाला दिल्या विविध सूचना

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतोय. या शहराची स्थिती चिंताजनक आहे. यापार्श्वभूमीवर एक विशेष पथक मार्गदर्शनासाठी पाठवण्यात येणर असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी सांगितले. 


मंत्री अमित देशमुख यांनी रविवारी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे आढावा घेतला होता. सोलापूर शहर काही भागात विडी कामगार आहेत. झोपडपट्टीचा भाग आहे. या ठिकाणी वेगळ्या पध्दतीने काम करावे लागले. याबद्दल प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

कोरोनामुळे शहरात काही लोकांचा मृत्यू झाला. पण या रुग्णांना इतरही गंभीर आजार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. त्यामुळे त्यांची प्रकृती कोरोनाच्या विषाणूशी लढू शकली नाही. जिल्हा प्रशासन, महापालिकेने यासंदर्भात समाधानकारक काम केले आहे. खासगी रुग्णालयांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Solapur's position on 'Corona' is worrisome; A special team will be sent for guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.