शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राज्याच्या ऊस गाळपात सोलापूरचा २० टक्के वाटा, ३० कारखान्यांचे गाळप ९४ लाख मे.टन, राज्यात १८२ साखर कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:22 PM

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असून, राज्याच्या ४९७ लाख मेट्रिक टन गाळपात सोलापूरचा ९४ लाख मे. टन इतका हिस्सा आहे.

ठळक मुद्देराज्यात सध्या १८२ साखर कारखान्यांचे पूर्ण क्षमतेने गाळप सुरू जवळपास सर्वच महसूल विभागातील साखर कारखाने नोव्हेंबरपासूनच सुरू झालेकोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा उतारा ११ टक्केपेक्षा अधिक

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असून, राज्याच्या ४९७ लाख मेट्रिक टन गाळपात सोलापूरचा ९४ लाख मे. टन इतका हिस्सा आहे. राज्यात सध्या १८२ साखर कारखान्यांचे पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध आहे.  यामुळे जवळपास सर्वच महसूल विभागातील साखर कारखाने नोव्हेंबरपासूनच सुरू झाले आहेत. सात विभागात १८२ साखर कारखाने सुरू असून, १८ जानेवारीपर्यंत ४९६  लाख ८३ हजार मे.टन ऊस गाळप झाले होते. यातून ५२२ लाख क्विंटलद्वारे ९२  हजार पोती साखर तयार झाली आहे. गाळपात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी उताºयात कोल्हापूर जिल्हा प्रथम आहे. कोल्हापूरच्या हेमरस कारखान्याचा उतारा १३ टक्केच्या पुढे गेला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा उतारा ११ टक्केपेक्षा अधिक आहे. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील एखादा कारखाना वगळता सर्वच कारखान्यांचा साखर उतारा १० ते १२ टक्के दरम्यान आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या ३० साखर कारखान्यांचे गाळप सुरू असून, कोल्हापूरचे २२, सांगली १५, सातारा १४ व पुणे जिल्ह्यात १७ साखर कारखाने सुरू आहेत. कोल्हापूरप्रमाणे अहमदनगरचे २२ कारखाने सुरू असले तरी ऊस गाळपात कोल्हापूर आघाडीवर आहे. कोल्हापूरचे गाळप ७८ लाख ५७ हजार तर अहमदनगरचे गाळप ६३ लाख ९५ हजार मे.टन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांच्या ९३ लाख ५९ हजार मे.टन गाळपातून ९४ लाख ९६ हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. ----------------------------खासगी कारखाने उताºयात मागे - सोलापूर जिल्ह्यातील गाळप सुरू असलेल्या ३० पैकी सहकारी १७ साखर कारखान्यांचा उतारा १० टक्केपेक्षा पुढे आहे. पांडुरंगचा उतारा सर्वाधिक ११.०४ टक्के असून, सहकार महर्षीचा उतारा १०.९५ टक्के आहे. विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल पंढरपूर, भीमा टाकळी, संत दामाजी, लोकनेते बाबुरावआण्णा पाटील, सासवड माळी शुगर, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळ, विठ्ठल कॉर्पोरेशन, जकराया शुगर, सीताराम महाराज खर्डी, युटोपियन शुगर, गोकुळ शुगर, बबनराव शिंदे, जयहिंद व शिवरत्न आलेगाव या कारखान्यांचा साखर उतारा १० टक्केपेक्षा अधिक आहे. - विठ्ठल रिफायनरी करमाळा, भैरवनाथ लवंगी, फॅबटेक, मातोश्री शुगर, भैरवनाथ विहाळ, इंद्रेश्वर, सिद्धनाथ शुगर, लोकमंगल भंडारकवठे, कूर्मदास, मकाई, चंद्रभागा, आदिनाथ व सिद्धेश्वर कारखान्याचा उतारा ८ ते १० टक्के दरम्यान आहे. - सोलापूरच्या सहकारी ११ पैकी पाच तर खासगी १९ पैकी ८ कारखाने साखर उताºयात मागे आहेत. सहकारी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.३१ तर खासगीचा १० टक्के इतका आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने