शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

सोलापूरकरांनो.. काय आवडतं तुम्हाला ? पंचवीसचा मास्क की शंभर रुपयांचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 12:48 PM

अधिकाºयांना दिले कारवाईचे टार्गेट; थुंकणाºयांना आता जागेवरच दंड

ठळक मुद्देमहापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमधून जन्म दाखले देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेतशहरातील रस्त्यांवर कचरा वाढत आहे. हद्दवाढ भागात अनेक बेशिस्त नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेतआतापर्यंत १७ आॅगस्टपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत ७ हजार ४०९ जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली

सोलापूर : महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षकांनी दररोज पाच हजार तर आरोग्य निरीक्षकांनी दोन हजार रुपयांचा दंड प्रशासनाकडे जमा करावा. अन्यथा या अधिकाºयांवरच कारवाई होईल, असा इशारा उपायुक्त धनराज पांडे यांनी दिला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य निरीक्षकांनी मास्क न वापरणारे, रस्त्यावर थुंकणाºया नागरिकांवर शासन आदेशानुसार कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले होते. अधिकाºयांनी आठ ते दहा दिवस मोहीम राबवली. त्यानंतर पावत्या पुस्तके कपाटात टाकून दिली.

उपायुक्त पांडे यांनी बुधवारी विभागीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांची बैठक घेतली. सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, रस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे, कचरा रस्त्यावर टाकणे यासंदर्भात अधिकाºयांनी कारवाई सुरू करावी. तरच शहरातील नागरिकांना शिस्त लागेल. शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. सात दिवसांच्या आत माती हटवण्यात यावी. कामात कुचराई केल्यास अधिकाºयांवर कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला.

विनामास्क फिरणाºया दीडशे जणांवर कारवाई 

  • - कोरोनामुळे प्रशासनाच्या वतीने मास्क घालण्याचे सूचना देण्यात आले आहेत. पण, तरीही या सुचनेकडे दुर्लक्षकरणाºयांविरूध शहरात सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. बुधवारी एकाच एकूण १५० जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाÞही कारवाई शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
  • - ही मोहीम आसरा, पार्क चौक, छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणी राबवण्यात आली.  यात एकूण ६९५ वाहने तपासण्यात आली. यातील १३८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच विना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा पालन न करणाºयांवर ही कारवाई करण्यात आली. 
  • - आतापर्यंत १७ आॅगस्टपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत ७ हजार ४०९ जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली तर या सर्वांकडून ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जन्म दाखले दिलेच पाहिजेतमहापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमधून जन्म दाखले देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत; मात्र अनेक कार्यालयांमधून वेळेवर दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरातील स्मशानभूमीत ज्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार झाले. त्यांची नोंद विभागीय कार्यालयांकडे जायला हवी. यात कुचराई करु नका. अन्यथा निलंबित व्हाल असा इशाराही पांडे यांनी दिला.

खरंच कारवाई होणार का?शहरातील रस्त्यांवर कचरा वाढत आहे. हद्दवाढ भागात अनेक बेशिस्त नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. मनपा अधिकाºयांचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. आता उपायुक्त पांडे यांनी यासंदर्भात अधिकाºयांवर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात खरोखरच कारवाई सुरू होते का? याकडे लक्ष आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका