शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांचा पुढाकार; ज्यानं घडविली मूर्ती, त्याच्याकडेच सोपविले बाप्पा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 13:17 IST

पुढच्या वर्षी याच मूर्तीची प्रतिष्ठापना : वसंतनगर मित्रप्रेम तरुण मंडळाचा पुढाकार

ठळक मुद्देवसंतनगर तसेच आणखी काही भागातून आम्ही गणेशमूर्ती घेतल्या आहेतपुढील वर्षी मूर्तीला रंग देऊन त्यावर कोरीव काम करून भाविकांना देण्याचे नियोजनतीन वर्षांपूर्वी सुमारे ५०० मूर्ती  घेऊन त्या पुन्हा भाविकांना देण्यात आल्या होत्या

सोलापूर : यंदाच्या वर्षी सोलापुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. विजापूर रोड परिसरातील वसंत नगरमधील नागरिकांनी यात सहभाग घेतला. त्यांनी आपल्याकडील २० मूर्ती मूर्तिकाराला देऊन पर्यावरणपूरक विसर्जन केले.

यंदाच्या वर्षी कोरोनामुळे शहरातील तलावात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास प्रशासनाने मनाई केली होती. त्यामुळे भाविकांनी पीओपीच्या (प्लॅस्टर आॅफ पॅरिस) मूर्ती न घेता शाडूच्या घेतल्या. अशा मूर्ती अधिक प्रमाणात उपलब्ध न झाल्याने भाविकांना पीओपीच्या मूर्ती घ्याव्या लागल्या. अशा मूर्र्तींचे महापालिकेतर्फे विभागनिहाय संकलन करण्यात येत होते. या परिस्थितीचा विचार करून वसंत नगर येथील मित्रप्रेम तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडील मूर्ती महापालिकेकडे न देता पुन्हा मूर्तिकाराला देण्याचा विचार समोर आला.

ज्या नागरिकांनी शाडूची मूर्ती आणली त्यांनी घरीच विसर्जन केले, तर ज्यांनी पीओपीची मूर्ती आणली त्यांनी या विचाराला प्रतिसाद देत मूर्तिकाराला मूर्ती देणे मान्य केले. पाहता पाहता वसंत नगरमधून २० मूर्ती मित्रप्रेम तरुण मंडळात आणल्या गेल्या. सर्व मूर्र्तींची सामुदायिक आरती करण्यात आली. प्रसादाचे वाटप आणि गणपती बाप्पांचा गजर करण्यात आला. सोलापुरातील मूर्तिकार गोपाल दुस्सा यांनी या मूर्र्तींचे संकलन केले.

एका मेसेजवरून विचार उतरला प्रत्यक्षातवसंतनगरमधील नागरिक हे पर्यावरणप्रेमी आहेत. त्यांचा प्रत्येक पर्यावरणपूरक उपक्रमात नेहमीच पुढाकार असतो. यंदाही फक्त एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवरील आवाहनाला येथील नागरिकांनी प्रतिसाद देऊन हा आगळावेगळा उपक्रम राबविल्याचे राजू कलमाडी यांनी सांगितले.

वसंतनगर तसेच आणखी काही भागातून आम्ही गणेशमूर्ती घेतल्या आहेत. या मूर्तींची व्यवस्थित काळजी घेतली जाते. पुढील वर्षी मूर्तीला रंग देऊन त्यावर कोरीव काम करून भाविकांना देण्याचे नियोजन आहे. तीन वर्षांपूर्वी सुमारे ५०० मूर्ती  घेऊन त्या पुन्हा भाविकांना देण्यात आल्या होत्या. - गोपाल दुस्सा, मूर्तिकार. 

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव