सोलापूरकरांनी घेतला स्मशानात सहलीचा आनंद! भूतबाधा, करणी, जादूटोणाची भीती झाली दूर
By शीतलकुमार कांबळे | Updated: September 15, 2023 13:52 IST2023-09-15T13:52:04+5:302023-09-15T13:52:15+5:30
अमावस्येच्या दिवशी भूत दिसतात, भुते स्मशानात राहतात, स्मशानात नकारात्मक ऊर्जा असते, भुताचे पाय उलटे दिसतात या सर्व अंधश्रद्ध दूर करण्यात आल्या.

सोलापूरकरांनी घेतला स्मशानात सहलीचा आनंद! भूतबाधा, करणी, जादूटोणाची भीती झाली दूर
सोलापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शाखेतर्फे अमावस्येच्या रात्री स्मशानात सहल आयोजीत करण्यात आली. रविवार पेठ, अक्कलकोट पाण्याची टाकीजवळील सार्वजनिक स्मशानभूमीत हा उपक्रम घेण्यात आला. भूतबाधा, करणी, जादूटोणाची भीती दूर करण्यात आली.
अमावस्येच्या दिवशी भूत दिसतात, भुते स्मशानात राहतात, स्मशानात नकारात्मक ऊर्जा असते, भुताचे पाय उलटे दिसतात या सर्व अंधश्रद्ध दूर करण्यात आल्या. स्मशान, भुते आणि संबंधित अंधश्रद्धा या विषयावर डॉ. अस्मिता बालगावकर यांनी मार्गदर्शन केले. ब्रह्मानंद धडके यांनी प्रात्यक्षिक करत लोकांच्या मनातील करणी, जादू आदी गैरसमज दूर केले.
यावेळी अनिसचे अध्यक्ष प्रा. शंकर खळसोडे, निशा भोसले, सरिता मोकाळी, यशवंत फडतरे, लता ढेरे, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, विजय जाधव, निलेश गुरव, केवल फडतरे, सुषमा फडतरे, प्रकाश कणकी, शकुंतला सूर्यवंशी, मार्था आसादे, सीए सनी दोशी, मोनिका दोशी, धनाजी राऊत, परशूराम कांबळे उपस्थित होते. मागील सहा वर्षांपासून स्मशानभूमीत स्वच्छता अभियान घेणारे राजू दासरी, श्रीनिवास यन्नम, वेणूगोपाल कोडम यांनी सहभाग घेतला.