शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

सोलापुरी शड्डू ; महागड्या जिममुळे कामगारांच्या मुलांची मेहनत आखाड्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:01 IST

काशिनाथ वाघमारे।  सोलापूर : गिरणी कामगारांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाºया गवळी वस्ती (देगाव रोड) मध्ये महागड्या जिममुळे कामगारांची मुले ...

ठळक मुद्देया तालमीतून केवळ मल्लांचा सरावच होतो नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक वारसाही जपला जिमच्या ६८ वर्षांत असंख्य पैलवान पोलीस, सैनिक आणि प्रशासकीय अधिकारी बनून तालमीचा नावलौकिक वाढविला दोन तास जवळपास ३५ मल्ल सराव करताहेत दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे

काशिनाथ वाघमारे। सोलापूर : गिरणी कामगारांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाºया गवळी वस्ती (देगाव रोड) मध्ये महागड्या जिममुळे कामगारांची मुले आखाड्यात सराव करताहेत. जिमच्या ६८ वर्षांत असंख्य पैलवान पोलीस, सैनिक आणि प्रशासकीय अधिकारी बनून तालमीचा नावलौकिक वाढविला आहे़ या जिममध्ये आज दररोज सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास जवळपास ३५ मल्ल सराव करताहेत दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.

१९५० पासून या तालमीत मल्ल घडताहेत़ सुरेश निंबाळकर यांनी अनेक वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळात मल्लांना प्रोत्साहन दिले़ त्यांच्या निधनानंतर महादेव गवळी आणि औदुंबरबुवा जगताप यांनी हा वारसा चालविला़ २५ वर्षांपूर्वी पत्र्याच्या तालमीचा लूक आता बदलला आणि या तालमीत व्यायामाचीही काही साधने दाखल झाली़ आज जिमच्या जमान्यातही मुलांचा या तालमीकडे कल आहे़ जाम मिल, लक्ष्मी-विष्णू, नरसिंग गिरजी मिलमधील सेवानिवृत्त कामगारांची मुले या जिममधून तयार झाली आहेत़ काही मल्ल हे शिक्षण घेताहेत तर काही मुले अर्धवेळ काम करून तालमीत सराव करताहेत.

या तालमीच्या उस्तादांनी सामाजिक उपक्रमावरही भर दिला आहे़ मल्लांच्या गुणवंत मुलांना विविध प्रकारची मदत करतात़ याबरोबरच बौद्धिक विकासासाठी विविध स्पर्धा घेतात़ या मल्लांना घडविण्यासाठी बाळासाहेब गवळी, विजय घुले, ब्रह्मदेव खटके, ईश्वर अहिरे प्रयत्न करताहेत़

तालमीतून सुरू झाले उत्सव- या तालमीतून केवळ मल्लांचा सरावच होतो नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक वारसाही जपला गेला आहे. याचाच एक भाग म्हणून मागील काही वर्षात या तालमीतील मल्लांनी गणेशोत्सव सुरु केला. त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव आणि शिवजयंतीही सुरु केली़ यामुळे पूर्वजांच्या इतिहासाची उजळणी या मल्लांमध्ये होतेय़ या उत्सव काळात हे मल्ल तालमीच्या सरावाबरोबर लेझीम आणि ढोलचाही सराव करतात.

रोज दहा किमी पळतात- गरीब कामगारांची मुले म्हणून ओळखल्या जाणाºया गवळी वस्तीतील मल्लांना आज चांगला खुराक मिळत नसला तरी दूध, अर्धा डझन केळी आणि खजुरावर सराव करताहेत़ याबरोबरच दररोज सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास सराव चालतो़ देगाव रोडला दररोज १० किलोमीटर धावतात़ ५०० जोर आणि ५०० बैठका काढतात़ त्यांच्याकडून उस्ताद औदुंबर जगताप हे तयारी करवून घेतात़ दररोज ते या मल्लांसोबत सकाळी उठून धावतात.

नावाजलेले मल्ल- अंबऋषी पैलवान, नामदेव निंबाळकर, वड्डा लक्ष्मण, दिगंबर गायक वाड, दाऊद पैलवान, कासीम पैलवान, भारत पवार, मधू निंबाळकर, शब्बीर दखणीकर हे स्थानिक पातळवर मल्लगिरीतून चमकले़ याशिवाय बाबा सुरवसे हे मल्ल यापूर्वी सिद्धेश्वर आखाडा गाजवला़ सलग २५ कुस्त्या जिंकण्याचा विक्रम त्यांनी नोंदविला़ 

टॅग्स :Solapurसोलापूर