शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

सोलापुरी शड्डू ; गोल तालमीत करतात आजही ४० मल्ल सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:28 IST

ब्रिटिशकालीन इतिहास : ग्रामीण भागातील पैलवानांनी गाजविले मैदान

ठळक मुद्देतुळजापूर वेशीमधील गोल तालमीत आजही ४० लहान-मोठे मल्ल सराव करतातया तालमीला हिंदकेसरी विजेत्यांसह अनेकांनी भेटी दिल्या गरिबांच्या मुलांना पूर्णपणे मोफत तालमीचे शिक्षण देण्यात येत

अमित सोमवंशी । सोलापूर :  तुळजापूर वेशीमधील गोल तालमीत आजही ४० लहान-मोठे मल्ल सराव करतात. जिमसाठी लागणारे आधुनिक साहित्यही या तालमीत असल्यामुळे तरुण पिढीला व्यायाम आणि कसरतीची गोडी लावण्याचे काम अखंडपणे याठिकाणी करण्यात येत आहे.या तालमीला हिंदकेसरी विजेत्यांसह अनेकांनी भेटी दिल्या आहेत. गरिबांच्या मुलांना पूर्णपणे मोफत तालमीचे शिक्षण देण्यात येत असून, कुस्त्यांचा फड खेळणारी काही मुले परदेशात असल्याचे सांगण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यात भीमराव सलगर, हांडे, देवकर आणि पिपरे यांनी आपल्या सहकाºयांसह मिळून तालमीची स्थापना केली आहे. या तालमीला आजपर्यंत अनेक दिग्गज पैलवानांनी भेटी दिल्या आहेत. या तालमीच्या मल्लांनी शहर-जिल्ह्याबरोबरच राज्यपातळीवर कुस्त्या जिंकल्या आहेत.  

गरीब, साधारण, आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्यांची मुले येथे कसरत करण्यासाठी येतात. त्यांना आजही व्यायामासाठी लागणारे जिमप्रमाणे साहित्य येथे आणून ठेवले आहे. या तालमीत आधी कासेगाव, कोल्हापूर, पंढरपूर, अकलूज येथील मल्ल शिकण्यासाठी येत असे. तुळजापूर वेशीमध्ये सध्या फक्त गोल तालीम चालू आहे.

ही ब्रिटिश काळातील तालीम असून, हिंदकेसरी विजेते आप्पालाल शेख हे गोल तालमीमध्ये कुस्ती खेळून गेले आहेत. या तालमीत आजही ४० लहान मल्ल दररोज येऊन सराव करतात़ त्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शरीरसौष्ठव प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशी उपकरणे आहेत. दिल्ली येथे २०१४ मध्ये झालेल्या महाविद्यालयीन कुस्तीच्या स्पर्धेत येथील मल्लांनी सहभाग नोंदविला होता. काही मुले प्राथमिक स्तरावर कुस्ती खेळत आहेत. सगळ्यांसाठी खुली असलेल्या या तालमीतील कुस्तीचा फड हा गोल असल्याने या तालमीला गोल तालीम असे नाव पडले. 

च्गोल तालमीचे बांधकाम ब्रिटिशकालीन आहे. जागा अपुरी पडत आहे. तालमीच्या नवीन बांधकामासाठी अनेकांकडे मदतीची मागणी केली. मात्र अद्यापपर्यंत कोणी मदत केली नसल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या युगात जिममुळे तालमीकडे दुर्लक्ष होत आहे. तालमीत व्यायाम करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी १५० च्या आसपास तरुण येतात. कुस्ती, खड्डा मारणे, डबल बार, सिंगल बार, शरीरसौष्ठवसाठी लागणारे साहित्य येथे उपलब्ध आहे.

मातीवर दीड लाख खर्च- येथे लहान मुलांना कुस्तीचे ज्ञान देऊन त्यांना भविष्यात चांगले कुस्तीपटू करण्याचे काम या तालमीमध्ये केले जाते. सोलापूर जिल्ह्यातील मल्लांना येथे राहण्यासाठी  सोय केली आहे. मोफत प्रशिक्षण दिले जाते. गोल तालमीमध्ये मोलमजुरी करणाºयांची मुले कुस्ती खेळण्यासाठी येतात. मातीची जोपासना काळजीपूर्वक केली जाते. मातीत लिंबू, काव, हळद, ताक, घाणीचे तेल टाकले जाते.

टॅग्स :Solapurसोलापूर