शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सोलापुरी शड्डू ; शालेय विद्यार्थ्यांना पैलवानकीचे डावपेच शिकविणारा भगवा आखाडा 

By appasaheb.patil | Updated: November 29, 2018 12:48 IST

आप्पासाहेब पाटील ।  सोलापूर : विद्यार्थी म्हटलं की शाळा, अभ्यास, दंगामस्ती, मोबाईलवरील गेम खेळणे आदी आलेच़ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ...

ठळक मुद्देसोलापूरच्या मध्यवर्ती भागात कै. रेवप्पाअण्णा परळकर यांनी १९७१ साली भगवा आखाडा, गवळी तालमीची स्थापना शेकडो शाळकरी विद्यार्थी शरीर पिळदार करण्यासाठी लालमातीत सकाळ-संध्याकाळ व्यायाम करीत पैलवानकीचे डावपेच शिकतातसिद्धेश्वर केसरी स्पर्धेचा मान भगवा आखाड्याला

आप्पासाहेब पाटील । 

सोलापूर : विद्यार्थी म्हटलं की शाळा, अभ्यास, दंगामस्ती, मोबाईलवरील गेम खेळणे आदी आलेच़ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शहरं डिजिटल होऊ लागली़ मात्र, या सोलापूरसारख्या स्मार्ट शहरात शेकडो पैलवान घडविणाºया भगवा आखाडा गवळी वस्ती तालमीचे काम वाखाणण्याजोगे आहे़ या तालमीत आजही शेकडो शाळकरी विद्यार्थी शरीर पिळदार करण्यासाठी लालमातीत सकाळ-संध्याकाळ व्यायाम करीत पैलवानकीचे डावपेच शिकतात.

नवीपेठ परिसरात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर एका छोट्याशा जागेत सोलापुरातील पैलवानकीची परंपरा टिकण्यासाठी सोलापूरच्या मध्यवर्ती भागात कै. रेवप्पाअण्णा परळकर यांनी १९७१ साली भगवा आखाडा, गवळी तालमीची स्थापना केली.

शहरातील सर्व तालमींचे प्रमुख या तालमीला केंद्रबिंदू मानतात. १९७१ सालच्या काळात कै. गंगाराम परळकर, कै. गोविंद नाईकवाडे, कै. बाबा परळकर, कै. गुंडाप्पा कोरे, कै. प्रभाकर परळकर, कै. मारुती परळकर आदींनी सोलापुरात कुस्तीपटू घडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते़ त्यावेळी कै. तुकाराम लकडे (बुवा) यांनी वस्ताद म्हणून यशस्वी भूमिका बजावली होती.

दरम्यान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिममधील यंत्रसामुग्रीने युवकांचे लक्ष वेधले. मात्र, भगवा आखाड्यातील भरत मेकाले, राजू परळकर, सिद्धेश्वर परळकर, अमर दुधाळ, सावळाराम कोलारकर, सतीश कोलारकर, सचिन खुर्द, नितीन खुर्द, प्रभाकर काशिद, अमोल काशिद, शिवाजी परळकर, अभिजित दुधाळ, आप्पा कोरे, अमोगसिद्ध चुंगीविडिया यांनी लालमातीतील कुस्तीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले व आजही ते करीत आहेत़ सध्या दशरथ मिसाळ हे वस्तादाची भूमिका पार पाडत आहेत़ या तालमीतील भरत मेकाले यांनी उपमहाराष्ट्र केसरीचा मान मिळविला आहे़ याशिवाय अमोल काशिद, सचिन खुर्द, नितीन खुर्द, गोपीनाथ घोडके, आतिश मोरे यांनी विविध पातळीवर यश मिळवून तालमीचे नाव महाराष्ट्रभर केले आहे.

या तालमीत शाळकरी मुलांची संख्या अधिक आहे़ नियमितपणे शेकडो मुले व्यायाम करण्यासाठी सकाळ-संध्याकाळी येतात़ आगामी काळात तालमीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी पाच मजली इमारतीबरोबर सर्वसेवासुविधा पुरविण्यावर आमचा भर असणार आहे़ सर्वाधिक व्यायाम करणारी तालीम म्हणून भगवा आखाडा, गवळी तालमीचा नावलौकिक आहे़- राजू परळकर, अध्यक्ष, भगवा आखाडा, गवळी तालीम

सिद्धेश्वर केसरी स्पर्धेचा मान भगवा आखाड्याला- जानेवारी महिन्यात सोलापूर शहरातील सिद्धेश्वर आखाड्यात सिद्धेश्वर केसरी स्पर्धा भरविण्यात येतात. या स्पर्धेत राज्यभरातून पैलवान सोलापूरला येतात़ मागील कित्येक वर्षांपासून या स्पर्धेचा मान भगवा आखाडा, गवळी तालमीला आहे़ आजपर्यंत या तालमीला अभिजित खटके, अमोल पुचडे, विकी बनकर, काका पवार यांच्यासह अन्य महाराष्ट्र केसरीपटूंनी भेटी दिलेल्या आहेत़ 

टॅग्स :Solapurसोलापूर