शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 सोलापूर जिल्हा परिषदेचा आता ‘मिशन घरकूल’ बांधकाम विभागात बैठकांचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:41 IST

स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाºया जिल्हा परिषदेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष वळविले आहे.

ठळक मुद्देबेसलाईन सर्व्हेनुसार जिल्हा परिषदेने शौचालयांच्या बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण२०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेने ९४५४ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले२५ डिसेंबरपर्यंत पहिला हप्ता देण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी यंत्रणांना दिले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाºया जिल्हा परिषदेने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष वळविले आहे. २०१६-१७ मधील लाभार्थ्यांची घरकूल बांधणी २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हावी आणि २०१७-१८ मधील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर कामाचा पहिला हप्ता जमा व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ग्रामीण विकास यंत्रणा आणि बांधकाम विभागातील अधिकाºयांसोबत बैठकांचा जोर लावला आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्यांनी या कामांना सहकार्य करण्याची सूचना अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निश्चित केलेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार जिल्हा परिषदेने शौचालयांच्या बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केले. हा राज्यातील विक्रम ठरला. त्यांचे केंद्र सरकारच्या पातळीवर कौतुकही झाले. पंतप्रधान आवास योजनेमध्ये पुरस्कार पटकावण्यासाठी डिसेंबरअखेर मागील कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. घरकूल बांधणीच्या कामात ग्रामसेवकांपासून पंचायत समितीपर्यंत यंत्रणा महत्त्वाची असते. पाठपुरावा केल्याशिवाय ही यंत्रणा काम करीत नाही. जिल्हा परिषदेला दरवर्षी हे काम पूर्ण करुन घेताना नाकीनऊ येतात, मात्र सध्या सर्वच यंत्रणेला प्रत्येक टप्प्यावर कामाचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले आहे. सीईओ डॉ. भारुड यांनी शनिवारी शाखा अभियंता, सर्व विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता यांची बैठक घेऊन २५ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. रविवारीही काही अधिकाºयांसोबत बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. घरकुलांच्या कामाबाबत पंचायत समित्यांच्या पातळीवर नेमके काय होत आहे याचा आढावाही घेतला जात आहे. -----------------------झेडपीने निश्चित केलेले उद्दिष्ट २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषदेने ९४५४ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. यातील ३४०० घरकुलांचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण झालेले आहे. उर्वरित ६००४ पैकी ५ हजार घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी डीआरडीए आणि बांधकाम विभागावर सोपविली आहे. २०१७-१८ साठी ५२७८ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. या सर्व लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्याबरोबरच त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पहिला हप्ता देण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी यंत्रणांना दिले आहेत. ------------------घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. यात वाळू हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वाळू मिळत नसल्याने काम पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचे ग्रामसेवक सांगत आहेत. यासाठी आम्ही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन विनंती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लक्ष घातल्यामुळे यात मार्ग निघेल. उद्दिष्ट वेळेवर पूर्ण होईल. - अनिलकुमार नवाळे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा. --------------------घरकूल कामाच्या प्रत्येक टप्प्यावरील कामाबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत. २०१६-१७ मधील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान पोहोचलेच पाहिजे. जे लोक काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. २५ डिसेंबरपर्यंत ठरवून दिलेली कामे होणार आहेत़ केवळ नामांकनासाठी नाही तर १०० टक्के लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी हा प्रयत्न आहे. - डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद