शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आघाडी अन् भाजपचीही पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:55 PM

उद्या होणार निवडणूक :निवडणुकीमध्ये रंगत, दोन्ही गटांचे सदस्य गेले सहलीवर

ठळक मुद्देझेडपीच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार झेडपीत एकूण ६८ सदस्य असून एक जागा रिक्त आहे तर एक सदस्य तुरुंगात निवडणुकीसाठी एकूण ६६ सदस्यांनी मतदान   केल्यास बहुमतासाठी ३४  सदस्यांची आवश्यकता

सोलापूर  : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत थेट  शरद पवार यांनी लक्ष घातल्याने केवळ महाविकास आघाडी नव्हे तर भाजपचे नेते कामाला लागले आहेत. त्यामुळे  या निवडीत कमालीची रंगत आली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने आपल्या सदस्यांना सहलीवर पाठविले आहे. महाविकास आघाडीसाठी राष्टÑवादीचे अध्यक्ष  शरद पवार, अजित पवार यांनी  तर भाजपसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार  विजयकुमार देशमुख यांनी फिल्डिंग लावल्याने चुरस निर्माण झाली. या व्यूहरचनेत मोहिते-पाटील विरुद्ध शिंदे असा एक संघर्षही पाहायला मिळतोय. 

झेडपीच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. झेडपीत एकूण ६८ सदस्य असून एक जागा रिक्त आहे तर एक सदस्य तुरुंगात आहे. निवडणुकीसाठी एकूण ६६ सदस्यांनी मतदान   केल्यास बहुमतासाठी ३४  सदस्यांची आवश्यकता असेल. जिल्ह्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मिळून महाविकास  आघाडीचा अध्यक्ष करावा, असे आदेश राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. 

महाविकास आघाडीकडून वेळापूर गटातील राष्टÑवादीचे सदस्य त्रिभुवन धार्इंजे, भोसे येथील अतुल खरात यांची नावे चर्चेत आहेत. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे बाळराजे पाटील, रणजितसिंह शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपने अध्यक्षपदासाठी करमाळ्यातील शिवसेना सदस्य अनिरुद्ध कांबळे यांची उमेदवारी निश्चित केल्याची चर्चा आहे. उपाध्यक्षपदासाठी अर्थ व बांधकाम समितीचे विद्यमान सभापती विजयराज डोंगरे, पंढरपूर तालुक्यातील वसंतराव देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. 

महाविकास आघाडीच्या सदस्यांची रविवारी सकाळी पंढरपुरात बैठक झाली. सर्व सदस्य पुण्याकडे रवाना झाले.  महाविकास आघाडीसोबत ३६ सदस्य आहेत. आवताडे गटाचे तीन सदस्य राष्ट्रवादीसोबत येतील, असा दावा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी केला. आघाडीसाठी राष्ट्रवादीचे आमदार भारत  भालके,  माजी आमदार राजन  पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे यांनी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीच्या हालचालींचा केंद्रबिंंदू करमाळ्याचे आमदार संजय शिंदे आहेत. 

देशमुखांचे डाव आणि मोहिते-पाटलांची पळापळ - फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख चांगलेच कामाला लागले आहेत. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी करमाळ्यातील सेनेच्या सदस्यांना भाजपसोबत आणले आहे. आमदार राजेंद्र राऊत आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांची विरोधी गटातील सदस्य फोडण्याची धावपळ चर्चेत आहे. भाजपसोबत ३२ सदस्य आहेत. आवताडे गटाचे तीन सदस्य भाजपसोबत येतील. त्यामुळे भाजपची सत्ता येईल, असा दावा करण्यात आला. भाजपने सर्व सदस्यांना गुलबर्गा येथे हलविले होते. 

आवताडे गटाच्या भूमिकेकडे लक्ष - दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यासोबत तीन सदस्य आहेत. तीन सदस्यांचा पाठिंबा हवा असेल तर आवताडे गटाच्या शीला शिवशरण यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आवताडे गटाने दोन्ही पक्षांकडे केली आहे. पण दोन्ही पक्षातील नेत्यांकडून आवताडे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. आवताडे गटाच्या सदस्यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याचीही चर्चा होती. त्यामुळे आवताडे गटाचे सदस्य भाजपसोबत जातील, अशी शक्यता वर्तविण्यात आली. 

फोडाफोडीच्या राजकारणात भाजप आक्रमक- मोहिते-पाटील गटाचे   राष्टÑवादीचे सहा सदस्य भाजपसोबत आहेतच. त्याशिवाय काँग्रेसच्या नागणसूर (ता. अक्कलकोट) गटाच्या सदस्या शीलवंती भासगी, शिवसेनेचे हत्तूर गटाचे सदस्य अमर पाटील, विद्यमान झेडपी अध्यक्ष शिवानंद पाटील, शिवसेनेच्या कोर्टी (ता. करमाळा) येथील सदस्या सविताराजे भोसले आणि केम येथील अनिरुद्ध कांबळे, नाझरे (ता. सांगोला) येथील दादासाहेब बाबर हे सात सदस्य भाजपसोबत आहेत, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारणVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखAjit Pawarअजित पवारSubhash Deshmukhसुभाष देशमुख