सोलापूर : बहिणीच्या लग्नासाठी दोन लाख रुपये न आणल्याने पत्नीचा छळ

By दिपक दुपारगुडे | Updated: May 13, 2023 19:09 IST2023-05-13T19:09:34+5:302023-05-13T19:09:42+5:30

पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Solapur Wife harassed for not bringing two lakh rupees for sisters marriage | सोलापूर : बहिणीच्या लग्नासाठी दोन लाख रुपये न आणल्याने पत्नीचा छळ

सोलापूर : बहिणीच्या लग्नासाठी दोन लाख रुपये न आणल्याने पत्नीचा छळ

सोलापूर : बहिणीच्या लग्नासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी वैशाली सतीश घुगे (वय ३५, रा. जुळे सोलापूर) हिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सततच्या त्रासाला कंटाळून तिने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला.

वैशाली हिचा सतीश आत्माराम घुगे याच्या साेबत २०१७ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंंतर सुरुवातीला कुटुंबीयांनी चांगले नांदविले. त्यानंतर मात्र कुटुंबीयांनी नणंदेच्या लग्नासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत तगादा लावला.

शिवाय पती सतीश घुगे याने त्याच्या जुन्या मैत्रिणीसोबत दुसरे लग्न करतो. तुझी गरज नाही म्हणून शिवीगाळ करत हाताने मारहाण केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. पती सतीश घुगे, सासू जयश्री घुगे, नणंद प्रियांका घुगे, प्रज्ञा घुगे (सर्व रा. साईवाडी, नेरूल पश्चिम सेक्टर, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस हवालदार कांबळे करीत आहेत.

Web Title: Solapur Wife harassed for not bringing two lakh rupees for sisters marriage