शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

सोलापूर विद्यापीठात आता उत्तर पत्रिकेची फोटो कॉफी मिळणार ई-मेलवर, विद्यापीठात हायटेक यंत्रणा कार्यान्वीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:57 PM

परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रिचेकिंग (पुनर्तपासणी) साठी हव्या असलेल्या उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी तत्काळ ई-मेलवर पाठवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील हायटेक यंत्रणेत दोन स्कॅनिंग मशीन दाखल या मशीनमुळे विद्यापीठाचा वेळ वाचणार असून विद्यार्थ्यांना तत्काळ पुनर्तपासणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीमध्ये गोपनीयता रहावी म्हणून तंत्रज्ञानाच्या सहायाने दोन वर्षांपूर्वी डिकोडिंग पद्धत सुरू करण्यात आली आहे.

संताजी शिंदे

सोलापूर दि १६ : परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रिचेकिंग (पुनर्तपासणी) साठी हव्या असलेल्या उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी तत्काळ ई-मेलवर पाठवण्यात येणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील हायटेक यंत्रणेत दोन स्कॅनिंग मशीन दाखल झाल्या आहेत. या मशीनमुळे विद्यापीठाचा वेळ वाचणार असून विद्यार्थ्यांना तत्काळ पुनर्तपासणी करता येणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सेमिस्टर १, ३, ५ आणि ७ च्या परीक्षा आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल जानेवारी महिन्यात लागला आहे. यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आणि अभियांत्रिकी या सर्व अभ्यासक्रमांचा समावेश आहे. निकाल लागल्यानंतर विषयाला जर कमी गुण मिळाले असतील किंवा अनुत्तीर्ण झाला असेल तर विद्यार्थ्याला शहानिशा करण्यासाठी उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी दिली जाते. निकाल लागल्यापासून ७ दिवसात विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे अर्ज करता येतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राध्यापकांचे मत घेऊन गुण वाढत असतील तर पुन्हा ७ दिवसात उत्तरपत्रिका रिचेकिंग (पुनर्तपासणी) साठी पाठवता येते. रिचेकिंगसाठी पाठवल्यानंतर दोन महिन्यांत पुन्हा तपासणी करून विषयाचा निकाल लावला जातो. या प्रक्रियेला लागणारा वेळ, विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड पाहून कामात गती आणण्यासाठी यंदा सोलापूर विद्यापीठाने दोन स्कॅनिंग मशीन घेतल्या आहेत. सध्या अभियांत्रिकी विषयाच्या सोडल्या तर सर्व विषयांच्या फोटो कॉपी संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. स्कॅनिंग मशीनमध्ये एका दिवसात ४०० ते ५०० उत्तरपत्रिका स्कॅन करता येणार आहे. स्कॅन झाल्यानंतर तत्काळ त्या उत्तरपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविल्या जाणार असून तसा ‘एसएमएस’ मोबाईलवर पाठविला जाणार आहे. अभियांत्रिकीच्या फोटो कॉपी देण्यात आल्या नाहीत, प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवसात हे काम सुरू केले जाणार आहे. सध्या १४०० फोटो कॉपीचे अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. स्कॅनिंग मशीनमुळे अवघ्या दोन ते चार दिवसात अभियांत्रिकीच्या फोटो कॉपीचे काम पूर्ण होऊन संबंधित विद्यार्थ्यांच्या मेलबॉक्समध्ये पडणार आहेत. -------------------------आधुनिक तंत्रज्ञानात भर...- विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीमध्ये गोपनीयता रहावी म्हणून तंत्रज्ञानाच्या सहायाने दोन वर्षांपूर्वी डिकोडिंग पद्धत सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाचा वेळ आणि मनुष्यबळ वाचवण्यासाठी एक तास आगोदर आॅनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठविल्या जात आहेत. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेच्या प्रिंटाऊट काढून विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. यात भर टाकीत आता उत्तरपत्रिका स्कॅनिंग करून त्या तत्काळ विद्यार्थ्यांच्या मेलबॉक्समध्ये जाणार आहेत. -----------------पूर्वी झेरॉक्स काढून फोटो कॉपी दिल्या जात होत्या, यामध्ये वेळ जात होता. विद्यार्थ्यांना तत्काळ फोटोकॉपी मिळावी म्हणून दोन मशीन घेण्यात आल्या आहेत. मार्च/एप्रिल-२०१८ मध्ये होणाºया सर्व परीक्षांचे फोटो कॉपी या मशीनद्वारे स्कॅन करून तत्काळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे ई-मेल आयडी व मोबाईल नंबर घेण्यात आले आहेत. भविष्यात मेल आयडीबरोबर बॅँक डिटेल घेवून गुण वाढल्यास भरलेली फी तत्काळ विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे.- बी. पी. पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ. 

टॅग्स :Solapurसोलापूर