सोलापूर विद्यापीठ निवडणुकीतील अभ्यासमंडळांचे निकाल जाहीर

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: September 30, 2022 15:29 IST2022-09-30T15:27:59+5:302022-09-30T15:29:16+5:30

इंग्रजी अभ्यास मंडळात डॉ. समाधान माने, डॉ. रामराजा मोटे आणि डॉ. मनोहर जोशी यांचा विजय झाला आहे. डॉ. अनुपमा पोळ यांचा पराभव झाला.

Solapur University Election Board Results Announced | सोलापूर विद्यापीठ निवडणुकीतील अभ्यासमंडळांचे निकाल जाहीर

सोलापूर विद्यापीठ निवडणुकीतील अभ्यासमंडळांचे निकाल जाहीर

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व अभ्यासमंडळाचे निकाल जाहीर झाले आहेत. रसायनशास्त्र अभ्यास मंडळासाठी डॉ. अब्दुल शेख, डॉ. सतीश देवकर आणि डॉ. विशाल कदम यांनी विजय मिळविला आहे. डॉ. सतीश मित्रगोत्री यांचा पराभव झाला.

प्राणीशास्त्र अभ्यासमंडळात डॉ. राजशेखर हिप्परगी, डॉ. संध्या साळुंखे आणि डॉ. लक्ष्मीकांत दामा यांचा विजय झालेला आहे. डॉ. विजयकुमार गाडेकर यांचा पराभव झाला. शैक्षणिक मूल्यमापन अभ्यासमंडळाच्या निवडणुकीत डॉ. सुग्रीव गोरे, डॉ. विद्युलता पांढरे आणि डॉ. प्रशांत ठाकरे यांचा विजय झालेला आहे. डॉ अश्विन बोंदार्डे यांचा पराभव झाला आहे. इंग्रजी अभ्यास मंडळात डॉ. समाधान माने, डॉ. रामराजा मोटे आणि डॉ. मनोहर जोशी यांचा विजय झाला आहे. डॉ. अनुपमा पोळ यांचा पराभव झाला.

Web Title: Solapur University Election Board Results Announced