शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी गुरुवारपासून चार दिवस सोलापूर-तुळजापूर मार्ग वाहनांसाठी बंद

By विलास जळकोटकर | Updated: October 21, 2023 16:48 IST

कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातून, शेजारच्या कर्नाटक राज्यातून पायी चालणाऱ्या देवी भक्तांची संख्या लाखोंच्या संख्येने असते.

सोलापूर : सोलापूरहूनतुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी २६ ते २९ ऑक्टोबर या चार दिवसांसाठी सोलापूर-तुळजापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी इटकळ, वैराग, बार्शी हा पर्यायी मार्ग ठरवण्यात आला आहे.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यातून, शेजारच्या कर्नाटक राज्यातून पायी चालणाऱ्या देवी भक्तांची संख्या लाखोंच्या संख्येने असते. या काळात भाविकांना चालताना वाहनांचा अडथळा होऊ नये, यासाठी दरवर्षीप्रमाणे शहर पोलिस व ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने नियोजन आखले आहे. तसेच शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर हद्दीपर्यंत आणि पुढे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने पोलिस आयुक्त डाॅ. राजेंद्र माने आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेशा बंदोबस्ताची कुमक तैनात केली आहे. एरवी होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सोलापूर बोरामणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. हा बदल २९ ऑक्टोबरच्या रात्री बारापर्यंत अंमलात असणार आहे.

असा आहे पर्यायी मार्गज्या भाविकांना पायी चालणे शक्य नाही, ते राज्य परिवहन महामंडळाची बस, तसेच खासगी वाहतुकीद्वारे देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जातात त्यांच्यासाठी या चार दिवसांच्या कालावधीत सोलापूर ते तुळजापूर जाण्यासाठी बोरामणी, इटकळ, मंगरुळ पाटी या मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.- ज्यांना सोलापूरहून धाराशिवला जायचे आहे त्यांनी वैराग मार्गे जावे.- ज्यांना सोलापूरहून लातूरला जायचे आहे त्यांनी सोलापूर, बार्शी, येडशी मार्गे मुरुड असा प्रवास करावा.- छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या वाहनांसाठी सोलापूर, बार्शी, येरमाळा या मार्गाचा अवलंब करावा.यांना या आदेशातून वगळलेवरील बंधने ही पोलिस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने व पोलिस ज्या वाहनांना परवानगी देतील, अशी वाहने व एसटी बसेस या वाहनांना लागू राहणार नाहीत. हा आदेश २६ ते २९ ऑक्टोबरच्या रात्री बारापर्यंत अंमलात राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीला शिक्षेस सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. 

टॅग्स :tuljapur-acतुळजापूरSolapurसोलापूर