मास्क न वापरणाऱ्यांना सोलापूरकरांना आता एक हजार रूपये दंड; पालकमंत्र्यांनी घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:05 IST2021-02-24T18:05:40+5:302021-02-24T18:05:55+5:30
पालकमंत्र्यांची माहिती; कोरोना प्रतिबंधासाठी घेतला निर्णय

मास्क न वापरणाऱ्यांना सोलापूरकरांना आता एक हजार रूपये दंड; पालकमंत्र्यांनी घेतला निर्णय
सोलापूर - गर्दी व संपर्कातून कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात पसरतोय. त्यामुळे मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे व गर्दीच्या कार्यक्रमावर बंदी आणणे याशिवाय अन्य उपाययोजना आखण्यात जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे.
दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे. जे वापरणार नाहीत त्यांना एक हजार रूपयांचा दंड आणि इतर ठिकाणी वापरणार नाहीत, त्यांना 500 रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
सोलापूरकरांनो लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियमांचे पालन करा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची काळजी घ्या, मास्कचा वापर करा. सॅनिटायझर, साबणाने हात धुवा, गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन भरणे यांनी केले.