शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
2
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
3
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
4
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
5
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
6
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
7
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
8
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
9
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
10
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
11
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
12
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
13
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
14
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
15
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
16
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
17
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
18
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
19
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
20
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

Solapur: यंदा आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी; १५०० वैद्यकीय अधिकारी करणार उपचार - तानाजी सावंत

By दिपक दुपारगुडे | Published: June 07, 2023 8:32 PM

Solapur: यंदाच्या आषाढी यात्रेत प्रथमच आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ही संकल्पना राबविली जाणार असून २० लाख भाविकांची आरोग्य तपासणी होणार आहे. यासाठी राज्यातून १५०० वैद्यकीय अधिकारी पंढरपुरात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी दिली.

- दीपक दुपारगुडे सोलापूर : यंदाच्या आषाढी यात्रेत प्रथमच आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ही संकल्पना राबविली जाणार असून २० लाख भाविकांची आरोग्य तपासणी होणार आहे. यासाठी राज्यातून १५०० वैद्यकीय अधिकारी पंढरपुरात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी दिली.

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या महाआरोग्य शिबिराची माहिती पत्रकारांना त्यांनी दिली. यावेळी प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, शिवाजी सावंत, अनिल सावंत, शिवाजी बाबर, श्याम गोगाव उपस्थित होते.

पुढे आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ह्या संकल्पनेवर आधारित २८ आणि २९ जून रोजी पंढरपुरात सुमारे २० लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ह्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहेत. पंढरपुरात ३ ठिकाणी हे आरोग्य शिबिर होईल. यामध्ये आरोग्य यंत्रणेसह सकस आहार वारकरी भक्तांना दिला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतPandharpur Wariपंढरपूर वारीSolapurसोलापूर