Solapur: ताबा सुटल्याने दुचाकी थेट कनॉलमध्ये कोसळली
By विलास जळकोटकर | Updated: August 19, 2023 22:24 IST2023-08-19T22:20:25+5:302023-08-19T22:24:26+5:30
Solapur: अंकोली गावातून क्षीरसागर वस्तीकडे दुचाकीवरून जाणारे दोघे दुचाकीवरील ताबा सुटल्याने कॅनॉलमध्ये पडून जखमी झाले. त्यांच्या सर्वांगास मार लागला. अंकोलीतील साळुंखे वस्ती कॅनॉलजवळ शुक्रवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली.

Solapur: ताबा सुटल्याने दुचाकी थेट कनॉलमध्ये कोसळली
- विलास जळकोटकर
सोलापूर - अंकोली गावातून क्षीरसागर वस्तीकडे दुचाकीवरून जाणारे दोघे दुचाकीवरील ताबा सुटल्याने कॅनॉलमध्ये पडून जखमी झाले. त्यांच्या सर्वांगास मार लागला. अंकोलीतील साळुंखे वस्ती कॅनॉलजवळ शुक्रवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली.
औदुंबर लिंबा पवार (वय- ५०), नागनाथ दिगंबर पवार (वय- ४०, रा. अंकोली), असे जखमींची नावे आहेत. यातील जखमी औदुंबर हे अंकोली गावातून दोघे मिळून दुचाकीवरून साळुंखे वस्ती कॅनॉलच्या वाटेवरून जात होते. अचानक त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट कॅनाॅलमध्ये पडली.
यामध्ये दोघांच्या सर्वांगास व डोक्यास मार लागला. रात्री १०च्या सुमारास त्यांना भाऊ सुनील पवार यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोघांना मुका मार जास्त लागला असून, डॉक्टरांनी उपचार सुरू केले असून शुद्धीवर आहेत. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.