सोलापूरचे तापमान पोहोचले ४२ अंश सेल्सिअसवर; यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

By Appasaheb.patil | Published: April 2, 2024 05:47 PM2024-04-02T17:47:27+5:302024-04-02T17:49:06+5:30

मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असतानाच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

solapur temperature reaches 42 degrees celsius recorded the highest temperature of this season | सोलापूरचे तापमान पोहोचले ४२ अंश सेल्सिअसवर; यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

सोलापूरचे तापमान पोहोचले ४२ अंश सेल्सिअसवर; यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्यातापमानात वाढ होत असतानाच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद मंगळवारी झाली. 

दरम्यान, सोलापुरात उकाडा कायम असून, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल तापमानात काहीशी वाढ झाली. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. पंधरा दिवसापासून उन्हाचे चटके जरा जास्तच बसू लागले आहेत. मंगळवारी तापमानाचा पारा ४२ अंशावर पोहोचला असून किमान तापमान २८.६ एवढे नोंदविले गेले आहे. एप्रिल महिन्यात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मार्च महिन्यात ३७ अंशावर पोहोचले तापमान एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून सोलापूरचे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले होते. मात्र वाढत्या उन्हामुळे उकाडा वाढल्याने सोलापूरकर चांगलेच तापले आहे. या महिन्यात सोलापूरचे तापमान ४२ अंशावर पोहोचले असून एप्रिल महिन्यात ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Web Title: solapur temperature reaches 42 degrees celsius recorded the highest temperature of this season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.