शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

सोलापूरच्या शिक्षकाला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधण्याची संधी

By appasaheb.patil | Updated: September 5, 2022 19:07 IST

सोलापूर :- शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील शिक्षकांशी व्हिडिओ ...

सोलापूर :- शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.  सोलापूर जिल्ह्यातील गावडेवाडीच्या शिक्षकाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षण उपसंचालक उकिरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह विस्तार अधिकारी उपस्थित होते.

कोरोना संकटानंतर अलीकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान ऊहापोह झाला.

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक डॉ नागनाथ येवले यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. येवले यांनी, सध्या पालकांचा ओढा हा एनसीइआरटी अभ्यासक्रम राबविणाऱ्या सिबीएससी, आयसीएसई, कॅमब्रीज कडे वाढत आहे त्यामुळे वन नेशन, वन एज्युकेशन नुसार एनसीइआरटी अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवाल का? असा प्रश्न विचारला. तसेच शैक्षणिक साहित्य, संगणक, इंटरनेट याबाबतचे प्रश्न महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी विचारले असता  मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन देखील यावेळी दिेले.

टॅग्स :SolapurसोलापूरEknath Shindeएकनाथ शिंदेTeachers Dayशिक्षक दिनSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद