शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

सोलापूर सिध्देश्वर यात्रा : नंदीध्वजांचे जुळे सोलापूरात पूजन, गोकुळनगरवासीय, विरांगणा महिला मंडळाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:55 IST

डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी़़़एकदा हर्र बोलाचा जयघोष़़़आसरा चौकातून निघालेल्या सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांची जुळे सोलापूरपर्यंत मिरवणूक काढली़  त्यानंतर नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देजुळे सोलापूरमधील गोकुळ नगरवासीय, विरांगणा महिला मंडळ यांच्या वतीने हा आध्यात्मिक उपक्रमएका रांगेत डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी आणि सिद्धरामेश्वरांच्या जयघोषाने जुळे सोलापूर मार्ग दुमदुमून गेला़ जुळे सोलापुरात या नंदीध्वज मिरवणुकीने वातावरण भक्तिमय करून सोडले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २  : डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी़़़एकदा हर्र बोलाचा जयघोष़़़आसरा चौकातून निघालेल्या सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांची जुळे सोलापूरपर्यंत मिरवणूक काढली़  त्यानंतर नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले.मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या नेतृत्वाखाली सराव काठ्यांची मिरवणूक निघाली़ जुळे सोलापूरमधील गोकुळ नगरवासीय, विरांगणा महिला मंडळ यांच्या वतीने हा आध्यात्मिक उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला़ या मिरवणुकीत हजारो भक्तगणांनी सहभाग नोंदवत सिद्धरामेश्वरांचा जयघोष केला़ आसरा चौकातून सिद्धरामांचा जयघोष करीत काठ्यांची मिरवणूक आसरा पुलावरुन डी मार्ट चौकातून पाण्याच्या टाकीजवळ आणली गेली़ एका रांगेत डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी आणि सिद्धरामेश्वरांच्या जयघोषाने जुळे सोलापूर मार्ग दुमदुमून गेला़ यावेळी टाकीच्या बाजूला मोकळ्या मैदानात या काठ्यांचे आगमन झाले़ येथे प्रशांत तडकल, किरण मळेवाडी, गुणवंत चव्हाण, प्रशांत शाबादी आणि मल्लिकार्जुन बागेवाडी या दापत्यांच्या वतीने पाचही नंदीध्वजांची पूजा करण्यात आली़ जुळे सोलापुरात या नंदीध्वज मिरवणुकीने वातावरण भक्तिमय करून सोडले़ या नंदीपूजन सोहळ्यानंतर भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला़ -----------------नंदीध्वजांचे स्वागत...-सिद्धरामेश्वरांच्या जयघोषात निघालेल्या नंदीध्वजांचे अनेक भक्तगणांनी स्वागत केले़ नगरसेविका मनिषा हुच्चे आणि त्यांच्या परिवाराने आसरा पुलाजवळ नंदीध्वजाला हार अर्पण करीत पूजा केली़ त्यानंतर काठ्या पुलावरुन मार्गस्थ झाल्या़ यावेळी रस्त्यावर एका बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती़ तसेच पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता़ चौका-चौकात गोकुळनगरच्या युवकांनी वाहतुकीला मार्ग काढून देत रहदारी ठप्प होऊ दिली नाही़ आसरा चौकात केला जयघोष़़़- मानाचे पाचही नंदीध्वज (सराव काठ्या) आसरा चौकात आणल्यानंतर यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते सराव काठ्यांची पूजा करण्यात आली़ यावेळी फटाके फोडून एकदा भक्तलिंग हर्र बोला़़़चा जयघोष करत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली़ अ‍ॅड़ मिलिंद थोबडे, नगरसेवक किरण देशमुख, भीमाशंकर म्हेत्रे, नगरसेवक राजेश काळे, नगरसेविका संगीता जाधव, राजश्री चव्हाण, विश्वनाथ शेगावकर, वेदमूर्ती बसवराजशास्त्री हिरेमठ, आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक आऱ वाय़ पाटील, जितेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती़

टॅग्स :Solapurसोलापूर