शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; इंद्रभवन अन् महापौर बंगलाही निघणार उजळून; कुरेशी, शिंदे, वडतिलेही करणार चौकांमध्ये रोषणाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:33 PM

सोलापूर : नंदीध्वज मार्ग लख-लख दिव्यांनी उजळून निघावा... २५-३० वर्षांपूर्वी यात्रेत दिसणाºया प्रकाशमय रस्त्यांचे स्मरण अन् उजाळा यंदा शहरवासीयांना ...

ठळक मुद्देवीरशैव व्हीजनच्या व्हॉटस्अप ग्रुपवर आणि फेसबूक पेजवरही जनजागृती सुरु२५-३० वर्षांपूर्वी यात्रेत दिसणाºया प्रकाशमय रस्त्यांचे स्मरण अन् उजाळा यंदा शहरवासीयांना मिळणार वीरशैव व्हीजनच्या जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ श्री सिद्धरामेश्वर चरणी पत्रके ठेऊन करण्यात आला

सोलापूर : नंदीध्वज मार्ग लख-लख दिव्यांनी उजळून निघावा... २५-३० वर्षांपूर्वी यात्रेत दिसणाºया प्रकाशमय रस्त्यांचे स्मरण अन् उजाळा यंदा शहरवासीयांना मिळणार आहे. महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिलेल्या शब्दानुसार इंद्रभवन, महापौर बंगलाही उजळून निघणार आहे. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राजू कुरेशी, संजय कुरेशी, बांबू व्यापारी मनोज वडतिले हेही आपल्या भागात विद्युत रोषणाई करण्याचा विडा उचलला.

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत वीरशैव व्हिजनने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेचा सोमवारी सकाळी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंचकमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, बसवराज अष्टगी, शिवानंद पाटील, बाळासाहेब मुस्तारे, प्रभुराज मैंदर्गी, श्रीशैल सास्तूर, बिपीन धुम्मा, प्रा. रेवणसिद्ध प्याटी, विवेक थळंगे, राजशेखर आमणगी, राजशेखर चडचणकर, गंगाधर गवसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे यांनी मोहिमेची माहिती दिली. नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे यांनी मोहिमेचे कौतुक करीत पंचकमिटीही मागे राहणार नसल्याची ग्वाही देत यात्रा प्रकाशमय करण्याची ग्वाही दिली. यावेळी सोमेश्वर याबाजी, सिद्राम बिराजदार, विजय बिराजदार, संजय साखरे, राजेश नीला, संगमेश कंटी, दीपक बडदाळ, श्रीमंत मेरु, मेघराज स्वामी, सचिन विभूते, विकास दसाडे, पौर्णिमा पाटील, वर्षा काशेट्टी, राजश्री गोटे, पल्लवी हुमनाबादकर आदी उपस्थित होते. 

आहे. 

कस्तुरबा मंडई परिसरात लायटिंग- नागणसुरे- कस्तुरबा मंडई ते जैन गुरुकुलपर्यंत लायटिंग करणार असल्याचे सांगताना आरपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जयराज नागणसुरे यांनी कस्तुरबा मंडई, बाळीवेस, चाटी गल्लीतील व्यापाºयांना आपल्या दुकानांवर लाईटच्या माळा सोडण्याबाबत आवाहन करणार आहे. वीरशैव व्हीजनचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. 

समतेची, राष्ट्रीय एकात्मतेची ही यात्रा असते. सर्व धर्माचे, जातीचे लोक यात्रेत सहभागी होतात. मी दत्त चौक ते सोन्या मारुती मंदिरापर्यंत लायटिंग करणार आहे. मी करतोय, तुम्हीही करा.- राजू कुरेशीअध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक

विजापूर वेस भागातून मानाचे सातही नंदीध्वज पुढे मार्गस्थ होतात. विजापूर वेस चौकात मोठे फोकस लावणार असून, या भागातील अधिकाधिक व्यापाºयांना वीरशैव व्हिजनच्या मोहिमेत सहभागी करून घेणार आहे.- मनोज वडतिलेबांबू व्यापारी

वीरशैव व्हिजनचा उपक्रम खूपच आवडला. मी माझ्या घरावर, दुकानांवर लाईटच्या माळा सोडणार आहे. यामुळे मला व्हिजनच्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इतरांनीही सहभागी झाल्यास यात्रा प्रकाशमय होईल. अन्य सेवाभावी संस्थाही पुढे आल्या पाहिजेत. - संजय शिंदेसामाजिक कार्यकर्ते.

‘लोकमत’चे कौतुक- वीरशैव व्हीजनच्या जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ श्री सिद्धरामेश्वर चरणी पत्रके ठेऊन करण्यात आला. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे यांनी ‘लोकमत’मध्ये येत असलेल्या ‘नंदीध्वज मार्गावर झळाळी’ या वृत्ताचे कौतुक केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका