महसूल कर्मचाऱ्यांना मिळेना दोन महिन्यांपासून वेतन; संघटना आंदोलनाच्या भूमिकेत
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: August 31, 2023 15:11 IST2023-08-31T15:09:41+5:302023-08-31T15:11:03+5:30
थकीत वेतन प्रश्न महसूल कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

महसूल कर्मचाऱ्यांना मिळेना दोन महिन्यांपासून वेतन; संघटना आंदोलनाच्या भूमिकेत
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर :महसूल विभागात कार्यरत अडीच हजार कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळेना. जुलै आणि ऑगस्टचे वेतन थांबल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष अनिल पवार यांनी दिली.
थकीत वेतन प्रश्न महसूल कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. दर महिना ११ कोटी रुपये वेतन निधी मिळणे अपेक्षित आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या वेतनकरिता २२ कोटी रुपये निधी अपेक्षित असताना गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी शासनाकडून केवळ ५ कोटी निधी प्राप्त झाला आहे. थकीत वेतन प्रश्न महसूल कर्मचारी संघटना आंदोलन करणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचीही माहिती शहराध्यक्ष अनिल पवार यांनी दिली.