शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

ठिबक अनुदान वितरणात सोलापूर पाचव्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 10:14 IST

जळगाव राज्यात प्रथम; नाशिक दुसºया तर बुलडाणा तिसºया क्रमांकावर आहे

ठळक मुद्देशासनाच्या पूर्वीच्या आदेशानुसार ५० टक्क्यांप्रमाणेच अनुदान वितरण दुष्काळी भागातील शेतकºयांना ठिबकसाठी ८० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याची घोषणामागील वर्षी पाण्याची तीव्र टंचाई होती तर यावर्षी पाण्याची उपलब्धता चांगली

अरुण बारसकरसोलापूर: दुष्काळी जिल्हा अशी ओळख बनलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांनी ठिबक संच बसविण्याला प्राधान्य दिले असून, ठिबक संच बसविणे व अनुदान वितरणात सोलापूर जिल्हा सध्या राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जळगाव जिल्हा प्रथम तर नाशिक जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे.

राज्यात मागील वर्षी तीव्र स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पाणीच नसल्याने ठिबक संचही शेतकºयांनी बसविले नाहीत. यावर्षी पाऊस चांगला पडल्याने बागायती क्षेत्र वाढले असून, उन्हाळ्यात पाण्याचा भेडसावणारा प्रश्न लक्षात घेऊन शेतकरी ठिबक संच बसविण्याला प्राधान्य देत आहेत. राज्यभरातून ठिबकसाठी तीन लाख २२ हजार ४८२ शेतकरी अर्जदार पात्र झाले असून, ठिबक संच बसविण्यासाठी कृषी विभागाने दोन लाख २९ हजार २१८ शेतकºयांना पूर्वसंमती दिली आहे. 

शेतकºयांनी ठिबक संच बसविणे, अनुदानासाठी प्रस्ताव आॅनलाईन करणे, कृषी खात्याकडून प्रस्तावांची तपासणी करणे व अनुदान वितरणासाठी शिफारस करण्याची प्रक्रिया पूर्ण करून अनुदान वितरित केले जात आहे. 

या सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकºयांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात जळगाव जिल्हा प्रथमस्थानी आहे. या जिल्ह्यातील ४ हजार ९१७ शेतकºयांना ठिबकचे अनुदान वितरित केले आहे. नाशिक जिल्ह्यातील चार हजार २१२ शेतकºयांसाठी तर बुलडाणा जिल्ह्यातील तीन हजार ९५३ शेतकºयांच्या खात्यावर अनुदान वर्ग झाले आहे.

जालना जिल्ह्यातील ३,८०७ शेतकºयांना तर सोलापूर जिल्ह्यातील ३,६५३ शेतकºयांना ठिबकचे अनुदान वितरित केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ३,६६४ शेतकºयांना ठिबकचे अनुदान वाटप झाले आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी पाण्याची तीव्र टंचाई होती तर यावर्षी पाण्याची उपलब्धता चांगली आहे.

जुन्या आदेशाप्रमाणेच अनुदान..- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागातील शेतकºयांना ठिबकसाठी ८० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आदेशही निघाला आहे, मात्र अनुदान ५० टक्क्यांप्रमाणेच शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जात आहे.च्आदेशाप्रमाणे ८० टक्क्यांप्रमाणे अनुदान कधी जमा होणार किंवा वाढीव अनुदान जमा होणार का?, याचे उत्तर कृषी खात्याकडून दिले जात नाही. 

शासनाच्या पूर्वीच्या आदेशानुसार ५० टक्क्यांप्रमाणेच अनुदान वितरण केले जात आहे. तशा सूचनाच आम्हाला आहेत. शासनाने ८० टक्के अनुदान वितरणाचा आदेश काढला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नाहीत.- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक