शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर रेल्वे विभागात १० हजार प्रवाशांसाठी  केवळ २२० पोलीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 10:51 IST

सोलापूर : प्रवाशांची वाढती संख्या, असुरक्षितता आणि गुन्ह्यांचे प्रमाण यावर नियंत्रण आणण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत सोलापूर विभागाला लोहमार्ग पोलिसांचे मनुष्यबळ पुरवण्याची मागणी विभागीय व्यवस्थापकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.वाडी-मनमाड आणि लातूर-मिरज या ९४८ कि़मी़च्या क्षेत्रफळातून दररोज किमान १० हजार प्रवासी प्रवास करतात़ या प्रवाशांसाठी लोहमार्ग पोलिसांची  संख्या अवघी २२० इतकी ...

ठळक मुद्देसोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची संख्या ही अपुरीच ४५ ते ५० प्रवाशांमागे एक पोलीस कर्मचारीदररोज किमान १० हजार प्रवासी प्रवास करतात़

सोलापूर : प्रवाशांची वाढती संख्या, असुरक्षितता आणि गुन्ह्यांचे प्रमाण यावर नियंत्रण आणण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत सोलापूर विभागाला लोहमार्ग पोलिसांचे मनुष्यबळ पुरवण्याची मागणी विभागीय व्यवस्थापकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

वाडी-मनमाड आणि लातूर-मिरज या ९४८ कि़मी़च्या क्षेत्रफळातून दररोज किमान १० हजार प्रवासी प्रवास करतात़ या प्रवाशांसाठी लोहमार्ग पोलिसांची  संख्या अवघी २२० इतकी आहे़ अर्थात ४५-५० प्रवाशांमागे एक लोहमार्ग पोलीस असल्याची खंत विभागीय व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे

रेल्वेचे जाळे पश्चिम महाराष्ट्रात मोठे आहे विभागात लातूर, उस्मानाबाद, मिरज, पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर, पुणे मार्गावरुन दररोज किमान ४५ रेल्वे गाड्या सोलापूर स्थानकावर येतात, थांबतात आणि जातात़ रेल्वेतील अलीकडे गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता             आहे ते मनुष्यबळ अत्यल्प असल्याचे विभागीय व्यवस्थापकांचे मत आहे.

सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची एकूण संख्या ही २२० आहे़ याचे प्रमाण काढले असता ४५ ते ५० प्रवाशांमागे एक पोलीस कर्मचारी ठरतो़ यापैकी सर्वच  पोलीस हे रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी नाहीत़ यापैकी १/४ अंश पोलीस हे कार्यालयीन  कामकाज, न्यायालयीन कामकाज आणि इतर कामात गुंतलेले असतात़ 

अशी आहे वस्तुस्थिती- दानापूर (बिहार) - १२००- भोपाळ (मध्यप्रदेश) - ५१०- सिकंदराबाद (तेलंगणा) - ४५५- झाशी (उत्तर प्रदेश) - ४४५- सोलापूर (महाराष्ट्र) - २२०

रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यात आघाडीवर असलेल्या प्रमुख राज्यांच्या तुलनेत सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची संख्या सर्वात खाली आहे़ प्रवाशांची असुरक्षितता, वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत पोलिसांचे पुरेसे बल मिळणे अपेक्षित आहे़ त्यादृष्टीने पोलीस महासंचालकांकडे मागील महिन्यात पत्रव्यवहार करून त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला आहे़- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर 

प्रवाशांच्या तुलनेत सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची संख्या ही अपुरीच असेल़ हे मनुष्यबळ इतक्यात लगेच पुरवणे शक्य नाही़ विभागीय व्यवस्थापकांकडून पत्रव्यवहाराद्वारे तसा प्रस्ताव आलाय का ते पाहून घेऊ.सर्व तांत्रिक अडचणीच्या अभ्यासाअंती मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार आहे़ - जयजित सिंग अतिरिक्त पोलीस महासंचालक 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेPoliceपोलिसRailway Passengerरेल्वे प्रवासी