आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : उमरग्याहुन मुंबई (ठाणे) कडे निघालेल्या एसटीचा मोडनिंबजवळील वरवडे टोलनाक्याजवळ अपघात झाला़ या अपघातात एसटीमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ हा अपघात बुधवार १४ फेबु्रवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे़उमरग्याहुन मुंबई (ठाणे) कडे निघालेली एसटी बस (एमएच १४ बीटी ३९०२) ही बस सोलापूर बसस्थानकातून सकाळी ९ च्या सुमारास ठाणेकडे रवाना झाली़ या एसटी बसमध्ये सोलापूरसह उमरग्यातील प्रवासी प्रवास करीत होते़ वरवडे टोलनाक्याजवळ वाहनांची तपासणी करणाºया वाहतुक पोलीसाला वाचविण्याच्या नादात एसटीने समोरील एसटीला धडक दिली़ या धडकेत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अन्य २५ जण जखमी झाले आहेत़ या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी मोडनिंब, टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़
सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोलनाक्याजवळ एसटीचा अपघात, २५ प्रवासी जखमी, वाहतुक पोलीसाला वाचविताना झाला अपघात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:58 IST
उमरग्याहुन मुंबई (ठाणे) कडे निघालेल्या एसटीचा मोडनिंबजवळील वरवडे टोलनाक्याजवळ अपघात झाला़ या अपघातात एसटीमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़
सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोलनाक्याजवळ एसटीचा अपघात, २५ प्रवासी जखमी, वाहतुक पोलीसाला वाचविताना झाला अपघात !
ठळक मुद्देया अपघातानंतर जखमींना उपचारासाठी मोडनिंब, टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले