शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Solapur Politics; कोठे, शेख यांना काँग्रेसमध्ये घ्या : अशोक चव्हाण; शिंदे भेटले मात्र मी एमआयएममध्येच : तौफिकभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:24 IST

सोलापूर : लोकसभेला काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या घरवापसीबद्दल प्रयत्न ...

ठळक मुद्देकाँग्रेसमधील घडामोडी, सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने चर्चेला उधाणकाँग्रेसच्या उमेदवाराची ताकद वाढविण्यासाठी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांच्या घरवापसीवर चर्चा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या घरवापसीबद्दल प्रयत्न

सोलापूर : लोकसभेला काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या घरवापसीबद्दल प्रयत्न करण्याची सूचना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या दोघांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला काँग्रेसभवनमध्ये उधाण आले आहे. 

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण खासगी दौºयानिमित्त सोलापुरात आले होते. यादरम्यान त्यांनी सोलापूर लोकसभेच्या स्थितीचा कानोसा घेतला.

काँग्रेसच्या उमेदवाराची ताकद वाढविण्यासाठी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांच्या घरवापसीवर चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्याशी चर्चा करून पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न व्हावा, अशी त्यांनी सूचना केली होती. त्या धर्तीवर या दोघांना कोणत्या पद्धतीने परत आणता येईल, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाºयांमधून गुप्तगू सुरू होती़ कोठे व शेख यांना परत काँग्रेसमध्ये घेतल्यास शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण सोलापुरात फायदा होणार आहे. हे गणित ओळखून त्यांच्या घरवापसीची व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महेश कोठे यांची ‘राधाश्री’वर जाऊन भेट घेतली. शिंदे यांना घरापर्यंत आणण्याची जबाबदारी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी पार पाडली. यावेळी शिंदे यांनी फक्त महेश कोठे यांच्या तब्येतीची चौकशी केली, असे सांगितले जात आहे. कोठे शिवसेनेत असले तरी अद्याप त्यांच्या निवासस्थानी, त्यांच्या बैठक व्यवस्थेजवळ अग्रभागी शिंदे यांचे छायाचित्र आहे. यामुळे इतर पदाधिकाºयांना नवल वाटले आणि या भेटीची वेगळी चर्चा सुरू झाली. यानंतर एका कार्यक्रमात एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांनी शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी शिंदे यांनी त्यांचे स्वागत केल्यावर दोघांमध्ये व्यासपीठावर संवाद झाला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही गोळाबेरीज सुरू असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे. कोठे यांची बायपास सर्जरी झाल्यामुळे ते आराम करीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

महेशअण्णा यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे घरी आले होते. त्यांनी आरोग्याबाबतच चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणूक व इतर कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. - देवेंद्र कोठे, नगरसेवक

एका लग्नात व जेवणाच्या कार्यक्रमात अशी दोन वेळा शिंदे यांच्याबरोबर भेट झाली़ यावेळी राजकीय काही बोलणे झाले नाही़ एमआयएम वंचित बहुजन आघाडीबरोबर आहे़या आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार आहे़-तौफिक शेखशहराध्यक्ष, एमआयएम़

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस