Solapur Politics; The second child should not be called a bandwagon; External Affairs Minister Laxmanrao Dhoble | Solapur Politics; वडिलांच्या सात-बाऱ्यावर ऐतखाऊ पोरांनं दुसऱ्यांना बांडगूळ म्हणू नये; माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळेंची टीका
Solapur Politics; वडिलांच्या सात-बाऱ्यावर ऐतखाऊ पोरांनं दुसऱ्यांना बांडगूळ म्हणू नये; माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळेंची टीका

ठळक मुद्देआदर्शाचा मोरच राष्ट्राच्या चौकीदाराला चोर म्हणतोय - लक्ष्मणराव ढोबळेरमेश कदम तेच पुन्हा मोहोळ तालुक्याचे आमदार होतील - लक्ष्मणराव ढोबळे

मोहोळ : वांगं निवडतानासुद्धा किडकं वांगं आपण बाजूला काढतो. त्याप्रमाणे आता तालुक्याचं हे किडकं वांगं बाजूला करण्याची वेळ आली आहे. सगळी बांडगुळं मी सरळ करतो म्हणणा-या मालकांना मी हक्कानं एवढेच सांगेन, वडिलांच्या सात-बा-यावर ऐतखाऊ पोरानं दुस-याला बांडगूळ म्हणणे बरोबर नाही. त्याची किंमत काय आहे, हे राजन पाटील तुमच्या पक्षाला माझ्या प्रचारातून मोजायला लावीन, असा इशारा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला.

गोटेवाडी (ता. मोहोळ) येथे भीमा-लोकशक्ती परिवारातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व सी. एम. चषकाचा मानकरी समाधान वाघमोडे-पाटील यांचा सत्कार आयोजित केला होता, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, माजी सभापती यशवंत नरोटे, झेडपी सदस्य तानाजी खताळ, भीमाचे माजी संचालक सुरेश शिवपुजे, नगरसेवक सुशील क्षीरसागर, सर्जेराव चवरे, फंटू गोफणे, वाघोली मिलचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र खांडेकर, सुनील पाटील, शिवाजी पासले, मुकुंद आवताडे, सागर लेंगरे, भारत घोडके, दत्ता शेळके आदी उपस्थित होते.

प्रा. लक्ष्मणराव ढोबळे पुढे म्हणाले, रमेश कदम आमदार म्हणून का चालले, तर ते मुंबईला. इथे मीच डमी आमदार म्हणून काम करतो, ही त्यांची कामाची स्टाईल आहे. आता बनसोडेंना आमंत्रण दिले आहे. त्यांचा स्टॉक एक्स्चेंजमध्ये ठेवून पुन्हा हेच राज्यकर्ते होणार आणि तालुक्याच्या राजकारणात मिरवणार. देशासाठी रक्ताच्या बलिदानाची रांगोळी करून, जीवाची बाजी लावून सीमेवर लढणाºया सैनिकांच्या काळजात शंका निर्माण करण्याचं काम करणाºयांनी बोलताना भान ठेवावं,  आदर्शाचा मोरच राष्ट्राच्या चौकीदाराला चोर म्हणतोय, असा खरपूस समाचार घेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार राजन पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली  

रमेश कदमच पुन्हा आमदार होतील
च्तालुक्यात पंचवीस वर्षे सेवा केली; मात्र शिस्त लावायला जमली नाही. रमेश कदम यांचा महिनाभरात जामीन होईल. तेच पुन्हा मोहोळ तालुक्याचे आमदार होतील. कारण मोहोळ तालुक्याला शिस्त लावण्याची धमक फक्त रमेश कदमांकडेच आहे, असे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले.

प्रकाशराव गड्यासारखं बोलू नका
कारखान्यावर हंगामी काम करणा-या रिफीलची कांडी संपलेल्या प्रकाश चवरेंनी ‘मला जरा संसाराकडे लक्ष द्या, लबाड बोलू नका, असा सल्ला दिला होता. याबाबत बोलताना ढोबळे म्हणाले, प्रकाशराव अगोदर गावावर राहायला या. गावातलं घर पडलंय का ते जागेवर आहे का बघा. तुम्ही आता सोलापूरकर झालात. भाड्यानं लावलेल्या गड्यासारखं बोलू नका, असा सल्ला दिला.

Web Title: Solapur Politics; The second child should not be called a bandwagon; External Affairs Minister Laxmanrao Dhoble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.